मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. काही दिवसांपूर्वी आमिर खान याचा लाल सिंह चढ्डा हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात बाॅलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान ही मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाकडून आमिर खान याला प्रचंड अपेक्षा होत्या. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन आमिर खान आणि करिना कपूर (Kareena Kapoor) यांनी केले. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला. लाल सिंह चढ्डा हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर सतत सोशल मीडियावर या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी ही सातत्याने केली जात होती. हा चित्रपट (Movie) फ्लाॅप गेल्याने आमिर खान हा प्रचंड निराश झाल्याचे सांगितले जात आहे.
लाल सिंह चढ्डा हा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर आमिर खान याने जाहिर केले की, पुढचे काही वर्षे तो त्याच्या कुटुंबियांना वेळ देणार आहे. सतत चित्रपटाच्या शूटिंगमुळे त्याने त्याच्या कुटुंबियांना कधी वेळ दिला नाही. काही दिवसांपूर्वी आमिर खान याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये पांढऱ्या दाढीमध्ये आमिर खान याला पाहून लोकांना धक्का बसला.
फक्त पांढरी दाढीच नाही तर डोक्याचे पांढरे केस आणि थकलेला चेहरा हा आमिर खान याचा दिसला. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रोड्यूसर महावीर जैन यांनी आमिर खान याच्याबद्दल काही मोठे खुलासे केले आहेत. महावीर जैन म्हणाले की, काही वर्षांपूर्वी बाॅलिवूडवर अंडरवर्ल्डचा प्रचंड असा दबदबा होता.
थेट आमिर खान याने अंडरवर्ल्डसोबत पंगा घेतल्याचे महावीर जैन यांनी सांगितले. महावीर जैन म्हणाले, सर्व बाॅलिवूड कलाकारांना अंडरवर्ल्डने आयोजित केलेल्या पार्ट्यांचे आमंत्रण स्वीकारून त्या पार्ट्यांना हजेरी लावावी लागत असतं. मग त्यांची इच्छा असो किंवा नसो. मात्र, त्यावेळी आमिर खान याने स्वत: चा जीव धोक्यात घालून कधीच पार्ट्यांचे निमंत्रण स्वीकारले नाही.
जसे सोशल मीडियावर दाखवले जाते, तसा एखादा व्यक्ती रिअल लाईफमध्ये नसतो असेही महावीर जैन म्हणाले. आमिर खान हा खूप चांगला व्यक्ती असल्याचे देखील महावीर जैन यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच आमिर खान याची लेक इरा खान हिचा साखरपुडा हा मुंबईमध्ये पार पडलाय. नुपूर शिखरे याच्यासोबत इराचा साखरपुडा झाला असून बरीच वर्षे इरा आणि नुपूर एकमेकांना डेट करत होते.