मुंबई : 1 ऑक्टोबर 2023 | आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. आपल्या कानावर असे अनेक किस्से समोर येत असतात, ज्यावर विश्वास ठेवणं पार कठीण असतं. सेलिब्रिटी देखील त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता ‘द कपिल शर्मा शो’ मधील एका प्रसिद्ध अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कलाकार त्यांच्या विनोदबुद्धीने चाहत्यांना हासवत असतात. पण त्यांच्या आयुष्यात देखील अशा अनेक अडचणी येतात, ज्यामुळे सेलिब्रिटी देखील पूर्णपणे खचतात. सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता अली असगर आहे.
सर्वांना कायम पोट धरुन हासवणार अली सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. एकवेळ अशी आली होती, जेव्हा अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक होती. सोशल मीडियावर अली याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने सांगितलं फक्त आईच्या विश्वासामुळे माझी सर्जरी झाला नाही. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.
अली म्हणाला, ‘माझी प्रकृती चिंताजनक होती, तेव्हा डॉक्टरांनी मला सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. माझ्या आरोग्याबाबत समस्या ऐकून माझी आई बेशुद्ध पडली. रुग्णालयातून आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा आई म्हणाली,’मी तुला सर्जरी करण्याची परवानगी देणार नाही. तुला काही झालं तरी चालेल पण मी सर्जरी होवू देणार नाही..’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘तेव्हा मी म्हणालो, सर्जरी नाही तर, काय करायचं आपण? तेव्हा आई म्हणाली, ‘तुला आणखी मोठ्या सर्जनकडे घेवून जाईल…’ माझ्या घरी एक मिंबर (देवाचं स्थान) आहे. आईने प्रार्थना केली. आज त्या गोष्टीला २२ वर्ष झाली आहे. विज्ञान एका बाजूला आणि आणि विश्वास एका बाजूला… तेव्हा फक्त आईच्या विश्वासामुळे चमत्कार झाला आणि प्राण वाचले…’ असं अभिनेता म्हणाला.
अली असगर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. अनेक मलिका आणि सिनेमांच्या माध्यमातून अभिनेता चाहत्यांच्या भेटीस आला. अनेत प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत अभिनेत्याने स्क्रिन शेअर केली आहे. एवढंच नाही तर, अभिनेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो.