मुंबई : अभिनेत्री अदा शर्मा गेल्या काही दिवसांपासून ‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे चर्चेत आहे.‘द केरळ स्टोरी’ सिनेमात अदा शर्मा हिने शालिनी उन्नीकृष्णन नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. शालिनी उन्नीकृष्णन ही एक हिंदू मुलगी आहे. सिनेमात अदा शर्मा हिने साकारलेल्या भूमिकेची देखील तुफान चर्चा रंगत असून अभिनेत्रीच्या अभिनयाचं सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. सध्या सर्वत्र अदा शर्मा हिची चर्चा रंगताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अदा शर्मा हिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. शिवाय अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी तिच्या खासगी आयुष्याबद्दल केलेलं वक्तव्य देखील चर्चेत आलं आहे.
‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या अदा शर्मा हिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता देखील अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीत अदा शर्मा हिने तिच्या लव्हलाईफबद्दल मोठा खुलासा केला होता. सध्या सर्वत्र अदा शर्मा आणि तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीची चर्चा रंगत आहे.
खासगी आयुष्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मला काही गोष्टी गुपित ठेवायला आवडतात. कोणालाच माहिती नाही की कोणाला डेट करत आहे. माझ्या कडून प्रेमासाठी होकार आहे, पण समोरच्या व्यक्तीबद्दल मला काही माहिती नाही..’ असं अभिनेत्री म्हणाली. त्यामुळे अदा शर्माच्या आयुष्यातील खास व्यक्ती कोण आहे. हे अद्याप कळू शकलेलं नाही..
रिलेशनशिपमध्ये काही गोष्टी कॉम्पलीकेटेड आहेत का? या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, ‘कॉम्पलीकेटेड असं काहीही नाही. मी माझ्याकडून स्पष्ट सांगत आहे की, मी रिलेशनशिपमध्ये आहे. मी प्रेमात आहे आणि मला विश्वास आहे ही चांगली गोष्ट आहे..’ यावेळी अदा शर्मा हिने तिच्या मित्रमंडळींबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे…
मित्रांबद्दल अदा शर्मा म्हणाली, ‘मी सध्या कोणाबद्दल बोलत आहे, हे माझ्या जवळच्या मित्रांना माहिती आहे.. ते माझ्या डोळ्यांमधून ओळखू शकतात. मला काही गोष्टी लपून ठेवायला आवडतात….’ एवढंच नाही तर मुलाखती दरम्यान अभिनेत्रीने लग्नाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे…
लग्नाबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘खऱ्या आयुष्यात मला नाही वाटत माझं कधी लग्न होईल.. सध्या नाही माहित मला लग्न करायचं आहे की नाही..’ प्रमे, रिलेशनशिप आणि लग्नाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सध्या अदा तुफान चर्चेत आहे.