मुंबई : बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांवर आधारित सिनेमे साकारण्यात येत आहेत. आतापर्यंत महिलांवर आधारित सिनेमे मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाले आणि प्रेक्षकांनी सिनेमांना भरभरुन प्रेम देखील दिलं. असे अनेक महिलाप्रधान सिनेमे आहेत ज्यांनी कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडून काढले आहेत. दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या कमाईची बरीच चर्चा सर्वत्र तुफान रंगताना दिसत आहे. शिवाय सिनेमाचं सर्वत्र कौतुक देखील होत आहे. सिनेमाला अनेक चढ – उतारांचा सामना करावा लागला. पण होणाऱ्या विरोधाचा आणि वादाचा सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर कोणताही परिणाम झालेला नाही. सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे.
सिनेमातील मुख्य अभिनेत्री अदा शर्मा हिच्या अभिनयाचं देखील सर्वत्र स्तरातून कौतुक होत आहे. सिनेमात अभिनेत्रीने साकारलेल्या भूमिकेने चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वाधिक ओपनिंग करणारा महिलाप्रधान सिनेमा ठरला आहे.
दिग्दर्शत सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाला प्रदर्शित होवून एक आठवडा झाला आहे. सिनेमाने पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली आहे. सिनेमाच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर सिनेमाने आतापर्यंत ८१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. येत्या काही दिवसांत सिनेमा १०० कोटी रुपयांचा टप्पा पार करु शकतो अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सिनेमात कोणताही मोठा कलाकार नाही, सिनेमाचं बजेट देखील फार कमी असताना बॉक्स ऑफिसवर मात्र सिनेमा कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाने कंगना रनौत, आलिया भट्ट, विद्या बालन यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या सिनेमांदेखील मागे टाकलं आहे. अदा शर्माचा सिनेमा बॉलीवूडच्या इतिहासातील सर्वाधिक करणारा महिलाप्रधान सिनेमा ठरला आहे.
२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या कंगना रणौतच्या ‘तनु वेड्स मनू रिटर्न्स’ या सिनेमाने पहिल्या आठवड्यात ६९.९५ कोटी रुपयांची कमाई करून विक्रम रचला होता. त्यानंतर २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या आलिया भट्ट स्टारर ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाने पहिल्या आठवड्यात ६८.८३ कोटी रुपयांची कमाई केली होती. एवढंच नाही तर कंगना रनौत स्टारर ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ सिनेमाने पहिल्या आठवड्यात ५७.९५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला होता…