मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी कमाईचा जादुई आकडा गाठला आहे. सुदिप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटाने अवघ्या 9 दिवसांत 112.99 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर याच चित्रपटाची जादू पहायला मिळतेय. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचं धर्मांतर करून कशा पद्धतीने दहशतवादात सामील करून घेतलं, याविषयीची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. देशभरात या चित्रपटातून वादही सुरू आहे आणि त्याचवेळी चित्रपटाचं कौतुकसुद्धा होत आहे. 2023 या वर्षात आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी ‘द केरळ स्टोरी’ हा 100 कोटींची कमाई करणार चौथा चित्रपट ठरला आहे.
5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपट अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्याविरोधात निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या संदर्भात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठाने चित्रपटावर बंदी घालण्याचं कारण काय, अशी विचारणा करणारी नोटीस शुक्रवारी बजावली.
शुक्रवार- 8.03 कोटी रुपये
शनिवार- 11.22 कोटी रुपये
रविवार- 16.40 कोटी रुपये
सोमवार- 10.07 कोटी रुपये
मंगळवार- 11.14 कोटी रुपये
बुधवार- 12 कोटी रुपये
गुरुवार- 12.50 कोटी रुपये
शुक्रवार- 12.35 कोटी रुपये
शनिवार- 19.50 कोटी रुपये
एकूण- 112.99 कोटी रुपये
पुढील काही दिवसांत चित्रपटाची एकूण कमाई 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त होऊ शकते, असाही अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने वर्तवला आहे.
#TheKeralaStory is a ONE-HORSE RACE… Has a SUPER-SOLID [second] Sat, cruises past ₹ ? cr in style… The BIG JUMP was on the cards, given the trends… Biz on [second] Sun should be HUGE again… [Week 2] Fri 12.35 cr, Sat 19.50 cr. Total: ₹ 112.99 cr. #India biz. #Boxoffice… pic.twitter.com/unr9iCEFgj
— taran adarsh (@taran_adarsh) May 14, 2023
या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. केरळमधल्या तीन मुलींची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी या तिघींचं आधी ब्रेनवॉश केलं जातं. नंतर त्यांना ब्लॅकमेल करून बळजबरीने ISIS या दहशतवादी संघटनेत सामील केलं जातं.
शालिनीच्या भूमिकेबाबत ती एका मुलाखतीत म्हणाली, “शालिनी उन्नीकृष्णनची भूमिका साकारताना मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप घाबरले होते. ही गोष्ट मी आयुष्यभर विसरु शकत नाही. लोकांना जागरूक करण्यात हा चित्रपट यशस्वी होत आहे याचा मला आनंद आहे. यातून एखाद्याचा जरी जीव वाचला तरी चित्रपट बनवण्याचा उद्देश पूर्ण होईल. जीवनात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करावा. गरज भासल्यास आपल्या ज्येष्ठांचंही मत घेतलं पाहिजे.”
1- पठाण (जानेवारी)
2- तू झुठी मैं मक्कार (मार्च)
3- किसी का भाई किसी की जान (एप्रिल)
4- द केरळ स्टोरी (मे)