मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाने अभिनेत्री आलिया भट्ट आणि कंगना रनौत यांना देखील मागे टाकलं आहे. तगडी स्टार कास्ट नसताना देखील सिनेमाने चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे. सिनेमातील अदा शर्मा हिच्या भूमिकेला देखील सर्वच स्तरातून भरभरुन प्रेम मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून बॉक्स ऑफिसवर फक्त आणि फक्त ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. शिवाय सिनेमा १०० कोटी रुपयांचा गल्ला ओलांडू शकतो अशी दाट शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. सध्या सर्वत्र ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा जोर धरत आहे.
चित्रपट विश्वेषक तरण आदर्श यांच्यानूसार, ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई पाहता, दुसऱ्या आठवड्यात सिनेमा तब्बल २५० कोटी रुपयांपर्यंत मजल मारु शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. संपूर्ण भारतात सध्या फक्त आणि फक्त ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचा बोलबाला दिसत आहे. तर जगभरात ३७ देशांमध्ये सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे.
एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी सिनेमा टॅक्स फ्री देखील करण्यात आला आहे. बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइड रिपोर्टनुसार, पहिल्या आठवड्यात सिनेमाने ८१.३६ कोटी रुपये कमावले आहेत. तर दुसऱ्या आठवड्याची सुरुवात १२ कोटी रुपयांनी झाली आहे. अशा प्रकारे सिनेमाने आतापर्यंत तब्बल ९३.३६ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार असल्यामुळे सिनेमा १०० कोटी रुपयांपर्यंच मजल मारेल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सिनेमातील मुख्य अभिनेत्री अदा शर्मा हिच्या अभिनयाचं देखील सर्वत्र स्तरातून कौतुक होत आहे. सिनेमात अभिनेत्रीने साकारलेल्या भूमिकेने चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वाधिक ओपनिंग करणारा महिलाप्रधान सिनेमा ठरला आहे.
बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणाऱ्या सिनेमाचं दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं आहे. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये करमुक्त करण्यात आला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली, ज्यामध्ये ‘द केरळ स्टोरी’च्या निर्मात्यांच्या याचिकेवर पश्चिम बंगाल सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. याचिकेत पश्चिम बंगाल सरकारला सिनेमावर बंदी घालण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.