The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’च्या क्रू मेंबरला धमकी; मुंबई पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल

| Updated on: May 09, 2023 | 8:26 AM

केरळ हायकोर्टाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोणत्याही विशिष्ट समुदायाबद्दल आक्षेपार्ह असं काहीच न दाखवल्याने कोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिला.

The Kerala Story | द केरळ स्टोरीच्या क्रू मेंबरला धमकी; मुंबई पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
The Kerala Story
Follow us on

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या क्रू मेंबरला एका अनोळखी नंबरवरून धमकी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी याबद्दल मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. चित्रपटाच्या टीममधील एका क्रू मेंबरला अनोळखी नंबरवरून धमकी देण्यात आली आहे. चित्रपटातील कथा दाखवून तुम्ही चांगली गोष्ट केली नाही, त्यामुळे घराबाहेर एकटं पडू नका, अशी धमकी क्रू मेंबरला मिळाली. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी संबंधित क्रू मेंबरला सुरक्षा पुरवली आहे. मात्र याप्रकरणी कोणतीच एफआयआर दाखल करण्यात आली नाही. लेखी स्वरुपात तक्रार न मिळाल्याने पोलिसांनी अद्याप FIR दाखल केली नाही.

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर बंदी आणली आहे. राज्यात कोणतीही हिंसेची घटना होऊ नये आणि शांतता राखण्यासाठी हे पाऊच उचलल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे देशात या चित्रपटावर बंदी आणणारं पश्चिम बंगाल हे पहिलं राज्य ठरलं आहे. तमिळनाडूमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला आहे. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा पद्धतीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं आणि ISIS चे दहशतवादी बनवण्यात आलं, याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

एकीकडे चित्रपटावरून वाद सुरू असताना दुसरीकडे या चित्रपटाने गेल्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ने आतापर्यंत 30 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. केरळमधील 30 हजारांपेक्षा अधिक मुली गायब झाल्या आणि नंतर त्यांना ISIS या दहशतवादी संघटनेत सामील करून घेतल्याचं ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं होतं. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता.

हे सुद्धा वाचा

केरळ हायकोर्टाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोणत्याही विशिष्ट समुदायाबद्दल आक्षेपार्ह असं काहीच न दाखवल्याने कोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाचं परीक्षण करून त्याला सर्टिफिकेट दिल्याने थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी तो योग्य असल्याचं कोर्टाने नमूद केलं आहे. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इनानी आणि सोनिया बिहानी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

‘द केरळ स्टोरी’ची कमाई

शुक्रवार – 8 कोटी रुपये
शनिवार – 11.22 कोटी रुपये
रविवार- 16.60 कोटी रुपये