Adah Sharma | ‘संधीसाठी शाहरुख खानसारखा पुनर्जन्म घ्यावा..’ असं का म्हणाली अदा शर्मा?

| Updated on: May 15, 2023 | 4:24 PM

अभिनेत्री अदा शर्मा हिचं बॉलिवूडमध्ये मिळालेल्या संधीबद्दल मोठं वक्तव्य... शाहरुख खान याचं नाव घेत अभिनेत्रीकडून मोठा खुलासा...

Adah Sharma | संधीसाठी शाहरुख खानसारखा पुनर्जन्म घ्यावा.. असं का म्हणाली अदा शर्मा?
Follow us on

मुंबई : अभिनेत्री अदा शर्मा सध्या ‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसवर फक्त आणि फक्त ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली आहे. सध्या अदा अनेक मुलाखतींच्या माध्यमातून तिच्या मनातील गोष्टी चाहत्यांना सांगत आहे. एका मुलाखती दरम्यान अभिनेत्री म्हणाली, ‘मला माझ्या प्रत्येक सिनेमानंतर मला वाटतं हा सिनेमा माझा शेवटचा सिनेमा असेल… यानंतर मला कोणताही सिनेमा मिळणार नाही…’ असं म्हणत अदा शर्मा हिने पुनर्जन्माबाबत देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

अभिनेत्री म्हणाली, ‘मी जेव्हाही एखादा सिनेमा करते तेव्हा मला वाटतं हा आपला शेवटचा सिनेमा असेल. दुसरी संधी मला मिळणार नाही. दुसऱ्यांदा माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही… पण प्रेक्षकांचे स्वप्न माझ्यासाठी मोठे आहेत.. असं मला आता जाणवू लागलं आहे. कारण चाहते मला कायम म्हणायचे अदा हिला अशी भूमिका साकारायला हवी… तशी भूमिका साकारायला हवी… मी स्वतःला भाग्यशाली समजते…’

पुढे अभिनेत्री म्हणते, ‘मी प्रचंड आनंदी आहे… हत्ती, कुत्रा यांसारख्या प्राण्यांसोबत खेळावं… यांसारखे मी कायम लहान स्वप्न पाहिले. उत्तम भूमिका साकारण्याचे स्वप्न देखील मी पाहिले, पण ते कधी पूर्ण होवू शकतील असं वाटलं नव्हतं… ‘ असं देखील अभिनेत्री म्हणाली…

हे सुद्धा वाचा

एवढंच नाही तर, ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाला मिळालेल्या यशाबद्दल देखील अभिनेत्रीने सांगितलं आहे. ‘मुलींमध्ये जागरुकता पसरवावी, या हेतूने आम्ही हा सिनेमा बनवला. प्रेक्षक सिनेमागृहात जावून सिनेमा पाहत असल्यामुळे मला प्रचंड आनंद होत आहे. एक कलाकार असल्यामुळे प्रेक्षकांनी माझं असं काम पहावं असं मला वाटतं.  ही संधी माझ्या आयुष्यात आला.. नाही तर मला ‘ओम शांती ओम’ सिनेमातील शाहरुख खानसारखा पुनर्जन्म घ्यावा लागला असता.. सध्या सर्वत्र अदा शर्मा हिचे चर्चा आहे..

अदा शर्मा हिच्या बॉलिवूड प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘1920’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने ‘हम हैं राही प्यार के’ ‘हर्ट अटॅक’, ‘हंसी तो फंसी’ ‘कमांडो-2’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूनिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अदा शर्मा बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहे.