The Kerala Story | केरळमधल्या पीडित मुलींसाठी ‘द केरळ स्टोरी’चे निर्माते करणार मोठी घोषणा

| Updated on: Dec 30, 2024 | 3:31 PM

'द केरळ स्टोरी' या चित्रपटात अत्यंत संवेदनशील मुद्दा अधोरेखित करण्यात आला. केरळमधल्या मुलींचं ब्रेनवॉश करून त्यांचं धर्मांतर करण्यात आलं, त्यांना दहशतवादाच्या रॅकेटमध्ये अडकवण्यात आलं.. अशी ही कथा आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

The Kerala Story | केरळमधल्या पीडित मुलींसाठी द केरळ स्टोरीचे निर्माते करणार मोठी घोषणा
The Kerala Story maker Vipul Shah
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : विपुल शाह निर्मित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात एक संवेदनशील मुद्दा मांडण्यात आला आहे. केरळमधल्या हजारो मुलींचं ब्रेनवॉश करून त्यांचं धर्मांतर केलं जातं आणि त्यानंतर दहशतवादाच्या रॅकेटमध्ये अडकवलं जातं. या चित्रपटात अशाच तीन मुलींची कथा दाखवण्यात आली आहे. यामध्ये अदा शर्मा, सोनिया बलानी, सिद्धी इदनानी आणि योगिता बहानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला देशभरातून जबरदस्त प्रतिसाद मिळत असतानाच आता निर्माते विपुल शाह यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

लव्ह-जिहाद, धर्मांतर आणि दहशतवाद्याच्या जाळ्यात अडकलेल्या केरळमधल्या पीडित मुलींसाठी विपुल शाह उद्या (बुधवार) मोठी घोषणा करणार आहेत. यासाठी बुधवारी त्यांनी एका संमेलनाचं आयोजन केलं आहे. या संमेलनात ते ही घोषणा करणार आहेत. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. अवघ्या 9 दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा 100 कोटींचा आकडा पार केला आहे.

हिमाचल प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाबाबत देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार या चित्रपटाच्या कथेला खरं आणि खोटं ठरवतंय. पश्चिम बंगाल, तमिळनाडूसारख्या राज्यांमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. अशातच हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री शांता कुमार यांचीही प्रतिक्रिया समोर आली. “काही राज्यांमध्ये या चित्रपटाला तीव्र विरोध होतोय. पण हा चित्रपट पाहण्यासाठी दिवसेंदिवस थिएटरमध्ये गर्दी वाढतेय. भारतातील सर्वांत महत्त्वाच्या आणि भयंकर विषयावर असा उत्तम चित्रपट बनवल्याबद्दल निर्मात्यांचं कौतुक झालं पाहिजे. देशातील अशा विविध समस्यांवर चित्रपट बनवले गेले पाहिजेत. निर्मात्यांनी फक्त चित्रपटच बनवला नाही तर देशहितासाठी उत्तम काम केलं आहे”, अशी प्रतिक्रिया शांता कुमार यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचं धर्मांतर करून कशा पद्धतीने दहशतवादात सामील करून घेतलं, याविषयीची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. देशभरात या चित्रपटातून वादही सुरू आहे आणि त्याचवेळी चित्रपटाचं कौतुकसुद्धा होत आहे. 2023 या वर्षात आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी ‘द केरळ स्टोरी’ हा 100 कोटींची कमाई करणार चौथा चित्रपट ठरला आहे.