मुंबई : अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’(The Kerala Story) सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. सिनेमात अदा शर्मा हिने साकारलेल्या भूमिकेची देखील तुफान चर्चा रंगत असून अभिनेत्रीच्या अभिनयाचं सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. सध्या सर्वत्र अदा शर्मा हिची चर्चा रंगताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अदा शर्मा हिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एवढंच नाही तर, अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत आली आहे. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री व्यस्त आहे. तर मुलाखतींच्या माध्यमातून अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यातील अनेक खास गोष्टींचा खुलासा करताना दिसत आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अदा शर्मा हिने तिचं खरं नाव सांगितलं आहे. अभिनेत्रीने फक्त स्क्रिनसाठी स्वतःचं नाव बदललं आहे. स्वतःच्या खऱ्या नावाबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘माझं खरं नाव चामंडेश्वरी अय्यर असं आहे….’ उच्चार करण्यासाठी नाव फार कठीण असल्यामुळे अभिनेत्री स्वतःचं नाव बदलून अदा शर्मा असं ठेवलं आहे. सध्या सर्वत्र अदा शर्मा हिची चर्चा रंगत आहे.
अदा शर्मा हिच्या बॉलिवूड करियरबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री गेल्या १ वर्षापासून मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. पण ‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. ३० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला सिनेमा बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा गल्ला ओलांडण्याची शक्यता आहे. आता येत्या दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अदा शर्मा हिच्या बॉलिवूड प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘1920’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने ‘हम हैं राही प्यार के’ ‘हर्ट अटॅक’, ‘हंसी तो फंसी’ ‘कमांडो-2’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूनिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अदा शर्मा बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहे.
अदा हिने तलुगू, कन्नड आणि तामिळ सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. सध्या अदा ‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘द केरळ स्टोरी’ सिनेमासाठी अभिनेत्री तब्बल १ कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.
अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमानंतर अदाच्या लोकप्रियतेत आणि नेटवर्थमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. अदा शर्मा हिच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीकडे जवळपास १० कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती आहे.