मुंबई : बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे होत असतानाच आता बिग बॉस 17 च्या विजेत्याचे नाव घोषित झाले आहे. बिग बॉस 17 चा विजेता अगोदरच ठरल्याची यावरून जोरदार चर्चा होताना दिसत आहे. यामुळे सोशल मीडियावर विविध चर्चा या सतत रंगताना दिसत आहेत. बिग बॉस 17 मध्ये पाहुणा म्हणून काही दिवसांपूर्वीच ओरी ऊर्फ ओरहान अवतरमणि हा दाखल झाला. ओरी हा दोन दिवस बिग बॉस 17 च्या घरात दिसला. यावेळी ओरी घरातील सदस्यांसोबत हंगामे करताना दिसला. इतकेच नाही तर बिग बॉस 17 च्या घरातील सदस्यांनी ओरी याच्यासाठी खास पार्टीचे देखील आयोजन केले. ओरी याची सोशल मीडियावर चांगलीच फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.
नुकताच ओरी याने बिग बॉस 17 च्या विजेत्याच्या नावाबद्दल अत्यंत मोठा खुलासा केलाय. ओरी याने थेट बिग बॉस 17 च्या विजेत्याचे नाव सांगितले. ओरी याने सांगितले की, बिग बॉस 17 चा विजेता अंकिता लोखंडे ही असणार आहे. अंकिता लोखंडे हे खूप जास्त मोठे नाव आहे. अंकिता लोखंडे ही बिग बॉस 17 ची विजेता असल्याचे ओरी याने सांगितले.
ओरी याने केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. यामुळे अनेकांनी थेट विचारले आहे की, खरोखरच अंकिता लोखंडे ही बिग बॉस 17 ची विजेता होणार का? बिग बॉस 17 चा विजेता अगोदरच फिक्स असल्याचे अनेकांनी म्हटले. यामुळे लोक हे बिग बॉस 17 च्या निर्मात्यांवर टीका करताना देखील दिसत आहेत.
ओरी याने फक्त हेच नाही तर समर्थ आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये विजेतेपदासाठी टक्कर होणार असल्याचे म्हटले. मात्र, शेवटी विजेता अंकिता लोखंडे हीच होणार. ओरी याच्या या विधानानंतर लोकांच्या निशाण्यावर बिग बॉस 17 चे निर्माते आल्याचे बघायला मिळत आहे. बिग बॉस 17 मध्ये पुढील काही दिवसांमध्ये मोठे बदल हे होऊ शकतात.
बिग बॉस 17 च्या घरात अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झालीये. मात्र, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये मोठे वाद होताना दिसत आहेत. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वीच विकी जैन याच्यावर अत्यंत गंभीर आरोप हे करताना अंकिता लोखंडे दिसली. चक्क एका भांडणामध्ये अंकिता लोखंडे हिने विकी जैन याला लाथ घातल्याचा देखील प्रकार घडला.