मुंबई : हल्ली बॉलिवूडमध्ये ‘हॉरर’ चित्रपट फारसे प्रेक्षकांच्या भेटीला येत नाहीत. आले तरी हॉररला कॉमेडीची जोड द्यावी लागते. ‘भुल भुलैय्या’सारखे हॉरर-कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांकडून आवडीने पाहिले जातात. मात्र जर अत्यंत भयानक, गूढ अशा हॉरर चित्रपटाचा अनुभव घ्यायचा असेल तर बरेच प्रेक्षक हॉलिवूड किंवा इतर भाषांमधील चित्रपटांकडे वळतात. सध्या असाच एक थरारपट सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिलेल्यांचा अक्षरश: थरकाप उडाला आहे. इतकंच नव्हे तर तो पाहिल्यानंतर काहींना पॅनिक अटॅक येतोय, तर काहीजण उल्टी करण्यासाठी थिएटरबाहेर पळत आहेत. या हॉरर चित्रपटात नेमकं असं काय दाखवलंय याची उत्सुकता नेटकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
‘द आऊटवॉटर्स’ असं या चित्रपटाचं नाव आहे. रॉबी बॅनफिचने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यानेच कथा लिहिली आहे. त्याने या चित्रपटात भूमिकासुद्धा साकारली आहे. रॉबी बॅनफिचसोबतच अँजेला बॅसोलिस, स्कॉट शामेल, मिशेल मे, लेस्ली अॅन बॅनफिच यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत.
या चित्रपटाची कथा एका मित्रांच्या ग्रुपभोवती फिरते. म्युझिक व्हिडीओ शूट करण्यासाठी ते मोजावे वाळवंटात जाण्याचा विचार करतात. रॉबी (रॉबी बॅनफिच), स्कॉट (स्कॉट शामेल), अँजी (अँजेला बॅसोलिस) आणि मिशेल (मिशेल मे) अशी या चौघांची नावं आहेत. या चित्रपटाचा ओपनिंग सीन पाहिल्यावरच हे लक्षात येतं की पुढे काहीतरी भयानक घडणार आहे. मदत मागण्यासाठी 911 वर केलेल्या कॉलचा आवाज या ओपनिंग सीनमध्ये ऐकू येतो. त्यानंतर पुढील कथा व्हिडीओ फुटेजच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे.
Robbie Banfitch’s #TheOutwaters is one of the best, most inventive, genuinely unsettling found footage films I’ve seen.
What starts off as a hangout movie gradually escalates into a terrifying descent into cosmic, Lovecraftian madness. I’ll be thinking about this one for awhile. pic.twitter.com/ZXMKL2yPRl
— a (@thisisnotahmad) October 26, 2022
काळ्याकुट्ट अंधारातील भयंकर आवाज, नि:शब्द सावलीच्या आकृतीची छोटीशी झलक, त्यातील पात्रांना झालेल्या दुखापती, त्यानंतर लखलखणारा प्रकाश आणि नंतर विस्कळीत झालेली परिस्थिती.. या गोष्टी चित्रपटात विशेष लक्ष वेधून घेतात. चित्रपटातील काही दृश्ये ही प्रकाशाच्या छोट्या वर्तुळातून दाखवली जातात, ज्यामुळे काही प्रेक्षकांच्या संयमाचा बांध तुटू शकतो. मात्र थरार निर्माण करण्यासाठी आणि कथेची गरज म्हणून त्या पद्धतीने ती दाखवल्याचं कळतं.
या चित्रपटात एक क्षण असा येतो जेव्हा चित्रपटात दाखवली गेलेली वेळ पूर्णपणे पलटते. मात्र त्यामुळे त्यातील गूढ संपत नाहीत. उलट त्या दृश्यांमुळे प्रेक्षकांच्या मनात अधिकाधिक प्रश्न निर्माण होतात. कमी बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटात कलाकारांनीही दमदार कामगिरी केली आहे.
I’d say tonight was pretty damn eventful! @RobbieBanfitch you’re amazing, hilarious, and this rewatch of @TheOutwaters has solidified my opinion that I believe this to have one of the most horrific and traumatizing sequences i’ve ever experienced in a found footage horror film ? pic.twitter.com/2bm7WNozK7
— Joseph ? (@JoeMonsterrr) February 21, 2023
‘द आऊटवॉटर्स’ या चित्रपटातील काही दृश्यांनी प्रेक्षकांना इतकं बेचैन केलंय की काही जण चित्रपट पाहता पाहताच आजारी पडले आहेत. तर काही प्रेक्षक अर्ध्यावरूनच थिएटरमधून बाहेर पळून आले. या चित्रपटाची दहशत इतकी आहे की काही प्रेक्षकांना त्यांच्या मनगटावरील स्मार्ट वॉच बंद करावी लागली. कारण वाढलेली हार्ट रेट त्यावर दिसू लागली आणि त्यामुळे प्रेक्षकांना पॅनिक अटॅक येऊ लागला.