बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही चांगलीच चर्चेत आहे. दीपिका पादुकोण हिचा कल्की हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. विशेष म्हणजे हा चित्रपट चांगलाच धमाका करताना दिसतोय. अमिताभ बच्चन आणि प्रभास हे देखील या चित्रपटामध्ये धमाका करताना दिसत आहेत. या चित्रपटाचे प्रमोशन करतानाही दीपिका पादुकोण दिसली होती. दीपिका पादुकोणचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून दीपिका पादुकोणचे चित्रपट चांगलीच कामगिरी करत आहेत. दीपिका पादुकोण लवकरच बाळाला जन्म देणार आहे.
दीपिका पादुकोण हिने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केली. दीपिका पादुकोण हिचे बेबी बंपसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोण ही रणवीर सिंह याच्यासोबत विदेशात खास वेळ घालवताना दिसली.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे आता अंबानींच्या पार्टीमध्ये पोहोचले आहेत. या पार्टीमध्ये फक्त दीपिका आणि रणवीरच नाहीतर जवळपास सर्वच बॉलिवूड कलाकार पोहोचल्याचे बघायला मिळतंय. सर्व कलाकार अंबानींच्या पार्टीमध्ये धमाका करताना दिसत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या हळदीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
सध्या सोशल मीडियावर दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि ओरी अर्थात ओरहान अवतरमणी यांचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय. या फोटोमध्ये दीपिका पादुकोण ही आपला बेबी बंप प्लॉंन्ट करताना दिसत आहे. विशेष म्हणजे दीपिका पादुकोण हिच्या बेबी बंपवर हात ठेवताना ओरी हा फोटोमध्ये दिसत आहे. बाजूला रणवीर सिंह हा देखील उभा असल्याचे बघायला मिळत आहे.
ओरीने दीपिका पादुकोणच्या बेबी बंपवर हात ठेऊन फोटो काढल्याने लोक हैराण झाले. एकाने कमेंट करत म्हटले की, दीपिका पादुकोण तू खरोखरच ओरीला तुझ्या बेबी बंपवर हात ठेऊन फोटो काढण्याची परवानगी दिली? दुसऱ्याने लिहिले की, दीपिका पादुकोणचा होणारा बेबी आता ओरीफाइड होणार. तिसऱ्याने लिहिले की, ओरी दीपिका आणि रणवीरच्या बाळाला जन्माच्या अगोदरच आर्शिवाद देत आहे.