प्रसिद्ध दिग्दर्शकाला फोन करून शिवीगाळ करणाऱ्याला अटक, चार सिम कार्ड आणि…

| Updated on: Jul 09, 2024 | 5:50 PM

नुकताच एक मोठा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकारानंतर मोठी खळबळ झाल्याचे बघायला मिळाले. एका प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाला आणि त्याच्या कुटुंबियांना फोन करून शिवीगाळ करण्यात आल्याची घटना नुकताच उघडकीस आलीये. या प्रकारानंतर पोलिसांनी आता कारवाई केलीये.

प्रसिद्ध दिग्दर्शकाला फोन करून शिवीगाळ करणाऱ्याला अटक, चार सिम कार्ड आणि...
police
Follow us on

नुकताच एक अत्यंत हैराण करणारा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकारानंतर मोठी खळबळ बघायला मिळतंय. चक्क एका प्रसिद्ध दिग्दर्शकाला आणि त्याच्या कुटुंबियांना फोन करून शिवीगाळ करण्यात आल्याची घटना घडलीये. या घटनेनंतर मोठी खळबळ बघायला मिळतंय. पोलिसांनी या प्रकरणात अटकही केलीये. एका प्रसिद्ध दिग्दर्शकाला आणि त्याच्या कुटुंबीयांना वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर या दिग्दर्शकाने पोलीस ठाणे गाठले. ज्या नंबर वरून कॉल येत होता ,त्या नंबरचा शोध घेऊन त्या व्यक्तीपर्यंत पोलिस पोहोचले.

अंधेरी येथे राहणाऱ्या आणि मासेमारी हा व्यवसाय करणाऱ्या मंगेश सुतारे यांचा हा नंबर असल्याचे समजले. मात्र, त्याने हा नंबर कधीच घेतला नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर वोडाफोन कंपनीचे प्रतिनिधी असलेल्या आणि या घटनेतील आरोपी असलेल्या राहुल कुमार टिळकधारी दुबेला या संदर्भात चौकशी केली.

कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या नावावर दोन ते तीन सिम कार्ड काढत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी एक सिम कार्ड ग्राहकाला देऊन उरलेली सिम कार्ड लोन रिकव्हरी करणाऱ्या टेली कॉल सेंटर सिटीजन कॅपिटल या कंपनीला दिल्याचे सांगितले.

रिकव्हरी टेली कॉल सेंटर सिटीजन कॅपिटल येथे ठाणे पोलिसांनी छापा टाकून मीरा भाईंदर येथे राहणारा 29 वर्षीय आरोपी शुभम ओझा आणि मिरा रोड येथे राहणारा 33 वर्षीय अमित पाठक याला अटक केली. ही लोन रिकव्हरी कंपनी स्लाईस फायनान्स, कोटक बँक आयडीएफसी फर्स्ट बँक यांच्या रिकव्हरीसाठी देखील काम करते.

प्रसिद्ध दिग्दर्शक यांनी कोणतेही लोन घेतलेले नसतानाही त्यांना फोन केले आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांच्याशी अश्लील वर्तन केल्याने या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या कंपनीला वोडाफोन कंपनीकडून काही सिम कार्ड हवे होते. मात्र वोडा फोन कंपनीने हे सिम कार्ड देण्यास काही कारणास्तव नकार दिल्याने या कंपनीने सिम कार्ड मिळवण्याचा दुसरा पर्याय वापरला असावा असा अंदाज देखील पोलीस व्यक्त करत आहे.

आरोपींकडून कॉम्प्युटरमधील 4 एस.एस.डी. हार्डडिस्क, 1 जीएसएम गेटवे, 1 टीपी लिंक कंपनीचा 24 पोर्ट स्विच, 1 राऊटर, 3 मोबाईल असा एकूण 77,300/- रुपये किमतीचा माल हस्तगत केला आहे. दरम्यान ठाणे शहरातील नागरिकांना अशा प्रकारे लोन रिकव्हरी टेली कॉल सेंटर मधील इसम फोन करून अर्वाचे भाषेत शिवीगाळ अथवा अश्लील भाषेत बोलत असतील तर त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.