Chikku | चिक्कू चित्रपटाला कावेरी वादाचा फटका, कार्यकर्त्यांनी घातला मोठा गोंधळ, अभिनेत्याने थेट हात…

| Updated on: Sep 28, 2023 | 11:04 PM

चिक्कू हा चित्रपट काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. चिक्कू या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहताना देखील दिसत आहेत.

Chikku | चिक्कू चित्रपटाला कावेरी वादाचा फटका, कार्यकर्त्यांनी घातला मोठा गोंधळ, अभिनेत्याने थेट हात...
Follow us on

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ हा त्याच्या आगामी चिक्कू (Chikku) या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. चिक्कू हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यामुळेच सध्या चित्रपटाची टीम जोरदारपणे या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतंय. विशेष म्हणजे प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबद्दल मोठा उत्साह बघायला मिळतोय. सिद्धार्थ (Siddharth) याचा चिक्कू हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट (Movie) आहे.

चिक्कू या चित्रपटाबद्दल सिद्धार्थ याच्या चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे रिलीजला काही दिवस शिल्लक असताना सिद्धार्थ हा या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसतोय. मात्र, नुकताच चिक्कू चित्रपटाच्या प्रमोशनच्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गोंधळ झालाय.

आता याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसल्याचे दिसतंय. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ देखील दिसतोय. चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन निर्मात्यांकडून करण्यात आले. यावेळी सिद्धार्थ हा पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसतोय.

हे सर्व सुरू असतानाच अचानकपणे यावेळी काही कार्यकर्ते हे पोहचतात. यावेळी हे कार्यकर्ते गोंधळ घालताना दिसतायंत. या कार्यकर्त्यांनी थेट सिद्धार्थ याला म्हटले की, तुझ्या चित्रपटाचे प्रमोशन करण्याची ही योग्य वेळ नाहीये. कावेरीच्या पाण्यावरून कर्नाटक तामिळनाडूशी भांडत आहे. यावेळी हे कार्यकर्ते थेट विरोध करताना दिसले. यावेळी सिद्धार्थ हा काही वेळ शांत बसताना दिसला.

हा गोंधळ कमी होण्याचे काही चिन्हं नसल्याने सिद्धार्थ हा सर्वांना धन्यवाद करत निघून गेला. मुळात म्हणजे कावेरी जल नियामक समितीने कर्नाटक सरकारला 3,000 क्युसेक कावेरीचे पाणी 18 दिवसांसाठी तामिळनाडूला सोडण्याची शिफारस केल्यानंतर हा निषेध केला जातोय. इतकेच नाही तर सत्ताधारी काँग्रेसने आता या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, याचा फटका आता सिद्धार्थ याच्या चित्रपटाच्या प्रमोशनला बसल्याचे दिसतंय. आता या गोंधळानंतर सिद्धार्थ हा काय भाष्य करतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण या सर्व गोंधळानंतर सिद्धार्थ हा थेट या पत्रकार परिषदेमधून बाहेर पडताना दिसता. यावेळी त्याने थेट हात जोडल्याचे देखील व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय.