मुंबई : बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे अक्षय कुमार याचे एका मागून एक असे सतत चित्रपट (Movie) फ्लाॅप जाताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे अक्षय कुमार हा या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसला होता. मात्र, असे असताना देखील अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट फ्लाॅप गेला. अक्षय कुमार याचे एका मागून एक असे पाच चित्रपट फ्लाॅप (Movie flap) गेले आहेत. अक्षय कुमार याची जादू बाॅक्स आॅफिसवरून गायब झाल्याची देखील चर्चा आहे.
अक्षय कुमार हा बाॅलिवूडचा असा एकमेंव अभिनेता आहे, त्याचे एका वर्षांला तब्बल चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अक्षय कुमार याचे चाहते त्याच्या हिट चित्रपटाची सातत्याने वाट पाहताना दिसत आहेत. अक्षय कुमार हा काही दिवसांपूर्वी आगामी चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी उत्तराखंडमध्ये गेला होता. याचे काही फोटोही त्याने शेअर केले होते.
अक्षय कुमार याच्या आगामी चित्रपटाबद्दल एक अत्यंत मोठी अपडेट पुढे आलीये. ओएमजी 2 चित्रपटाबद्दलची ही अपडेट असून चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलीये. तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार अक्षय कुमार याचा ओएमजी 2 हा चित्रपट 1 सप्टेंबरला नाही तर 16 फेब्रुवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. राधिका मदन आणि परेश रावल हे अक्षय कुमार याच्यासोबत या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत.
#Xclusiv… AKSHAY KUMAR – SUDHA KONGARA FILM TO ARRIVE NEXT YEAR… #AkshayKumar’s forthcoming film – directed by #SudhaKongara – gets a new release date: Will release in *cinemas* on 16 Feb 2024… Also features #RadhikaMadan and #PareshRawal.
The move is aimed to ensure apt… pic.twitter.com/k0Pt5d6Tam
— taran adarsh (@taran_adarsh) July 7, 2023
तरण आदर्श यांनी ओएमजी 2 बद्दलचे हे मोठे अपडेट शेअर केले आहे. यावर अजूनही चित्रपट निर्मात्यांनी काहीच भाष्य केले नाहीये. ओह माय गॉड 2 हा चित्रपट 11 आॅगस्ट 2023 रोजी रिलीज होणार आहे. अक्षय कुमार याचा हा चित्रपट नक्कीच धमाल करेल अशी अपेक्षा सर्वांनाच आहे. बडे मियां छोटे मियां हा देखील अक्षय कुमार याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काही दिवसांपूर्वीच हेरा फेरी 3 चित्रपटाला अक्षय कुमार याने नकार दिला होता. अक्षय कुमार हा हेरा फेरी 3 चित्रपटामध्ये दिसणार नसल्याचे कळताच त्याचे चाहते नाराज झाल्याचे बघायला मिळाले. चित्रपट निर्मात्यांकडे अक्षय कुमार हा अधिक फिसची मागणी करत असल्याचे त्यावेळी सांगितले गेले होते.
अक्षय कुमार याने चित्रपटाला नकार दिल्यानंतर निर्माते कार्तिक आर्यन याच्या संपर्कात होते. मात्र, शेवटी सर्वांनाच मोठा धक्का देत अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 चित्रपटाला होकार दिला. चित्रपटाला होकार देण्याच्या अगोदर एका मुलाखतीमध्ये अक्षय कुमार जाहिरपणे म्हणाला होता की, चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली नसल्याचे मी हेरा फेरी 3 चित्रपटाला नकार दिला.