मुंबई | 12 मार्च 2024 : बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये स्थान पक्क केलं आहे. आज त्या सेलिब्रिटींना कोणाच्या ओळखीची गरज नाही. फक्त भारतात नाहीतर, जगभरात त्या सेलिब्रिटींच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाहीतर, अभिनेता शाहरुख खान आहे. सांगायचं झालं तर, शाहरुख खान याने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख देखील निर्माण केली नव्हती… तेव्हा पासून गौरी खान हिने किंग खानची साथ सोडली नाही…
शाहरुख खान याला आज कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. अभिनेता कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगत आहे. तर अभिनेत्याची पत्नी गौरी खान देखील प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर आहे. गौरी आणि शाहरुख कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.
गौरी खान आणि शाहरुख खान यांची संपत्ती
गौरी खान आणि शाहरुख खान दोघांची नेटवर्थ प्रचंड तगडी आहे. जवळपास 983 मिलियन यूएस डॉलर… भारतीय चलनानुसार दोघांची मिळून संपत्ती 7304 कोटी रुपये आहे. जगातील श्रीमंत अभिनेत्याच्या यादीत देखील किंग खान अव्वल स्थानी आहे. शाहरुख कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.
गौरी खान हिच्या एकटीच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, किंग खान याच्या पत्नीची नेटवर्थ 220 मिलियन डॉलर आहे. अभिनय आणि सिनेमाच्या पडद्यावर सक्रिय असण्याव्यतिरिक्त, शाहरुख खान ब्रँड एंडोर्समेंट्समधून देखील मोठी कमाई करतो. एका जाहिरातीसाठी अभिनेता कोट्यवधी मानधन घेतो…
किंग खान आयपीएल स्पोर्ट्स फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सच्या मालकांपैकी एक आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंट नावाची कंपनी गौरी खान आणि शाहरुख खान एकत्रपणे चालवतात. शाहरुख खाननेही किड जेनिया ब्रँडमध्ये गुंतवणूक केल्याचे सांगितलं जातं.
रिलायन्स जिओ, थम्स अप, ह्युंदाई, दुबई टुरिझम यांसारख्या ब्रँड्सच्या जाहिराती करूनही शाहरुख खान भरपूर कमाई करतो. गौरी खान स्वतःचा ब्रँड डी डेकोर चालवते. शाहरुख याच्या मुलांनी देखील करियरला सुरुवात केली आहे.
शाहरुख – गौरी यांचा मोठा मुलगा आर्यन खान याने स्वतःचा क्लोदिंग ब्रँड सुरु केला आहे. तर मुलगी सुहाना खान हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. शिवाय सुहाना हिने जमिनींमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. किंग खान याच्या लेकीने अलिबागमध्ये जमीनी खरेदी केल्या आहेत.