मुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एस.एस. राजामौलीने (S. S. Rajamouli) काही दिवसांपूर्वी आगामी आरआरआर (RRR) चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. त्या पोस्टरमध्ये रामचरण घोड्यावर बसलेला आहे आणि गाडीवर एनटीआर दिसत होते. हे पोस्टर शेअर करताना चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली होती. राजामौली यांनी हे पोस्टर शेअर करताना लिहिले होते की, 13 ऑक्टोबरला अग्नि आणि पाणी एकत्र येणार आहेत. आता या चित्रपटाविषयी एक मोठी बातमी पुढे येत आहे. हा चित्रपट 10 भाषांमध्ये प्रदर्शित होईल. (The RRR film already grossed 348 crore before its release)
केवळ 5 भाषांमध्ये थिएट्रिकल राइट्ससाठी या चित्रपटाला आतापर्यंत 348 कोटीहून अधिक ऑफर मिळाल्या आहेत. जेव्हापासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली तेव्हापासून चित्रपटाला तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळमच्या थिएट्रिकल राइट्ससाठी एकूण 348 कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे. निजाममध्ये 75 कोटी, आंध्र प्रदेशात 165 कोटी, तामिळनाडूमध्ये 48 कोटी, मल्याळममध्ये 15 कोटी आणि कर्नाटकमध्ये 45 कोटी हा सर्व आकडा मिळून 348 कोटी रुपये होत आहे. तसेच या चित्रपटाला बॉलिवूडकडून देखील मोठ्या ऑफर्सही मिळत आहेत.
This October 13, witness Fire ? and Water ? come together as a FORCE that has never been experienced before ✊?
The biggest collaboration in Indian cinema is set to deliver a memorable experience!!!
THE RIDE BEGINS…#RRRMovie #RRRFestivalOnOct13th #RRR pic.twitter.com/SawlxK34Yi
— RRR Movie (@RRRMovie) January 25, 2021
आलियाने देखील या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते आणि लिहिले आहे की, 13 ऑक्टोबरला आरआरआरसाठी तयार व्हा राहा. ‘आरआरआर’ आलियाचा पहिला दाक्षिणात्य सिनेमा असणार आहे. त्याशिवाय ‘सिंघम’ अजय देवगणही या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा काल्पनिक असून 1920 मधील स्वातंत्र्यसैनिक अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन पात्रांभोवती असणार आहे.
संबंधित बातम्या :
चित्रपटाच्या डिस्ट्रीब्युटर्सने रिलीजसाठी हैरान केलं होतं, RRR च्या प्रोड्युसरचा खुलासा
Drugs Case | दीया मिर्जाच्या माजी मॅनेजर राहिला आणि करण सजनानीला NCB कडून अटक
Birthday Special : हिंदू असतानाही ए.आर. रहमान का झाले मुस्लिम?, वाचा INSIDE STORY
(The RRR film already grossed 348 crore before its release)