दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘ग्रोप्ड’ची निवड

| Updated on: Dec 23, 2023 | 5:24 PM

ग्रोप्ड या शॉर्ट फिल्मची निवड 2024 दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलसाठी करण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र काैतुक केले जात आहे. या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रथमेश सांजेकर याने केले आहे. तर, डीओपी म्हणून देवांश भट्ट याने काम पाहिले आहे. यामध्ये मराठी कलाकार विकास हांडे आणि मंगेश पवार यांनी अभिनय केला आहे.

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्रोप्डची निवड
Follow us on

मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील प्रथमेश सांजेकर याचे लेखन आणि दिग्दर्शन असलेली ग्रोप्ड (Groped) या शॉर्ट फिल्मची निवड 2024 दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलसाठी करण्यात आली आहे. जगातील 60 पेक्षा जास्त देशांमधून जवळपास 10 हजार फिल्म या फेस्टिव्हलमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यापैकी पहिल्या 100 मध्ये ग्रोप्डची निवड झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील प्रथमेश सांजेकर याने पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठअंतर्गंत महाविद्यालयातून फिल्म मेकिंगचे शिक्षण घेतले आहे.

केवळ अभ्यास म्हणून नाही तर आपण घडविणाऱ्या कलाकृतीला कौतुकाची थाप मिळून त्यातून सामाजिक संदेशही घराघरात पोहोचावा. यासाठी एक वर्ष सतत मेहनत घेत अनेक अडचणींवर मात करून प्रथमेश याने ग्रोप्ड लघुपटाची निर्मिती केली. त्याच्या या प्रयत्नाला केवळ कौतुकाची थाप नाही तर दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2024 (DPIFF) लघुचित्रपट श्रेणीत 10 हजार फिल्ममधून पहिल्या 100 मध्ये नामांकन मिळवण्याचा मान मिळाला आहे.

लघुचित्रपटाविषयी सांगताना प्रथमेश सांगतो की, सार्वजनिक ठिकाणी महिलांसोबत होणाऱ्या गैरवर्तन आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या मनातील भावना या विषयावर आधारीत ग्रोप्ड लघुपट आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना हा विषय सुचला व तब्बल एक वर्ष अभ्यास केल्यानंतर पुणे शहरात याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. ग्रोप्ड या लघुपटाला यापtर्वी पुणे फिल्म फेस्टिवलमध्ये उत्कृष्ट लेखक व दिग्दर्शनसाठी प्रथमेश याला पुरस्कार देखील मिळालेला आहे.

या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रथमेश सांजेकर याने केले आहे. तर, डीओपी म्हणून देवांश भट्ट याने काम पाहिले आहे. यामध्ये मराठी कलाकार विकास हांडे, अश्विनी बागल आमि मंगेश पवार यांनी अभिनय केला आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. रेल्वे, बस किंवा गर्दीच्या ठिकाणी महिलांसोबत गैरवर्तन केल्याच्या अनेक घटना घडतात.

त्यासंदर्भात अनेक महिला विरोध करून आवाज उठवत तसेच कायदेशीर कारवाई करतात किंवा त्या गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला धडा शिकवतात. मात्र, अनेक महिला भीती किंवा इतर काही कारणांमुळे गैर वर्तनाला विरोध करू शकत नाहीत. त्यांच्या मनातील भावना काय असतात या विषयावर ग्रोप्ड लघुपट निर्मिती करण्यात आल्याचे प्रथमेश सांजेकर याने सांगितले.