मुंबई | 5 नोव्हेंबर 2023 : कोरोना या धोकादायक विषाणूने फक्त भारतात नाही तर, जगभरात हाहाकार माजवला होता. कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. 2020 मध्ये आलेल्या कोराना विषाणूने सर्वकाही होत्याचं नव्हतं केलं होतं. दरम्यान, कोरोनाचा धोका टळलाचं सर्वत्र चित्र होतं. सरकारकडून लादण्यात आलेले नियम देखील पूर्णपणे शिथील करण्यात आले. पण आता बॉलिवूडची एक प्रसिद्ध दिग्दर्शिका कोरानाच्या विळख्यात अडकली आहे. खुद्द दिग्दर्शकीने तिचा अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितला आहे. ‘द स्काय इज पिंक’ सिनेमाची दिग्दर्शिका शोनाली बोस यांना कोरोनाची लागण झाली आहे. ‘कोरोना आपल्या भोवती आहे?’ असं वक्तव्य शोनाली बोस यांनी केलं आहे.
सोशल मीडियावर स्वतःचा फोटो पोस्ट करत शोनाली बोस म्हणाल्या, ‘गेल्या काही वर्षांमध्ये मी जे काही सहन केलं आहे. त्यापेक्षा जास्त आता माझी अवस्था वाईट आहे. कोविड! आपल्या आजू-बाजूला अद्याप आहे… यावर तुम्ही विश्वास ठेवाल… 102-3 ताप… बिलकूल चांगलं वाटत नाहीये… पुन्हा कोविड झाल्यामुळे मी त्रस्त आहे… देवालाच माहिती हा कोणता तणाव आहे..’
सध्या सर्वत्र शोनाली बोस यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, चाहते देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दिग्दर्शिकेच्या प्रकृतीसाठी चिंता व्यक्त करत आहेत. शोनाली बोस यांची प्रकृती लवकरात – लवकर सुधारावी यासाठी चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रार्थना करत आहेत,
शोनाली बोस यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्या फक्त दिग्दर्शिका नाही तर, उत्तम लेखक देखील आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक सिनेमासाठी काम केलं आहे. ‘अम्मू’ हा त्यांचा पहिला सिनेमा होता. ‘अम्मू’ सिनेमाला चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं. ‘मार्गारिटा विथ स्ट्रॉ’, ‘द स्काय इज पिंक’ यांसारख्या उत्कृष्ट सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहेत. पण आता कोरोना झाल्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.
सध्या सर्वत्र शोनाली बोस यांची चर्चा रंगली आहे. 2020 साली भारतात दाखल झालेल्या कोरोना व्हायरसने देशाचं मोठं नुकसान केलं. कोरोनाची लागण झाल्यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले. डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आणि इतरांनी देखील कठीण काळात देशाची सेवा आणि नारगिकांचे प्राण वाचवण्यास मदत केली. पण आता शोनाली बोस यांना पुन्हा कोरोना झाल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.