Corona महामारीवर आधारित The Vaccine War सिनेमाचा थक्क करणारा टीझर प्रदर्शित

| Updated on: Aug 15, 2023 | 12:46 PM

The Vaccine War सिनेमाचा थक्क करणारा टीझर; 'या' तारखेला सिनेमा होणार प्रदर्शित... जगभरात कोविड-19 मुळे हाहाकार माजला होता.. सत्य परिस्थिती प्रेक्षकांच्या येणार समोर...

Corona महामारीवर आधारित The Vaccine War सिनेमाचा थक्क करणारा टीझर प्रदर्शित
Follow us on

मुंबई | 15 ऑगस्ट 2023 : २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री (vivek Agnihotri) आणि पत्नी पल्लवी जोशी (Pallavi Joshi) त्यांच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. विवेक अग्नीहोत्री आता ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत सिनेमाची चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर, विवेक अग्नीहोत्री देखील सिनेमाबद्दल महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर असतात. आता ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War Teaser) सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

निर्मात्याने मंगळवारी स्वातंत्र्यदिनाचं निमित्त साधत सिनेमाचा टीझर प्रदर्शित केला आहे. जेव्हा जगभरात कोविड-19 मुळे हाहाकार माजला होता, तेव्हा अनेकांना कोरानाची लागण झाली होती. तर अनेकांना स्वतःचे प्राण गमवावे लागले. कोरोनावर मात करण्यासाठी देशात एक लस तयार करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

 

 

कोरोना काळात डॉक्टर आणि शास्त्रज्ञांना अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला होता. सत्य घडलेली घटना मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न विवेक अग्नीहोत्री यांनी केला आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ पहिला सिनेमा आहे, ज्यामध्ये भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चद्वारे COVAXIN बनवण्याचा प्रवास दाखण्यात येणार आहे…

सिनेमात अभिनेत्री पल्लवी जोशी आणि अभिनेता नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. खुद्द विवेक अग्नीहोत्री यांनी ट्वीटरवर सिनेमाचा टीझर प्रदर्शित केला आहे. चाहते देखील टीझरवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

टीझर प्रदर्शित करत विवेक अग्नीहोत्री यांनी सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची देखील घोषणा केली आहे. सिनेमा २८ सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. म्हणजे बॉक्स ऑफिस पुन्हा दोन सिनेमांमध्ये ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे. २८ सप्टेंबर रोजी अभिनेता प्रभास स्टारर ‘सालार’ सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे.