अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न 12 जुलै 2024 रोजी अत्यंत खास पद्धतीने मुंबई येथे पार पडले. या लग्नाची तयारी गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होती. विशेष म्हणजे लग्नाच्या अगोदर अनेक ठिकाणी प्री वेडिंग फंक्शन ठेवण्यात आले. या लग्नासाठी देशच नाहीतर विदेशातूनही नामवंत व्यक्ती पोहोचल्या होत्या. आता या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. बॉलिवूड कलाकार लग्नामध्ये मोठ्या संख्यने डान्स करताना दिसले. अनिल कपूर यांच्यापासून ते जान्हवी कपूरपर्यंत सर्वचजण डान्स करताना अनंत आणि राधिकाच्या लग्नात दिसत आहेत.
सध्या काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी स्टेजवर जान्हवी कपूर ही बॉयफ्रेंड शिखर पहाडिया याच्यासोबत खास डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर ही देखील दिसत आहे. दोघी बहिणींसोबत मिळून डान्स करताना शिखर पहाडिया हा दिसत आहे.
लोकांना आता जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांची जोडी आवडताना दिसत आहे. अनेकांचे म्हणणे आहे की, दोघे एकमेकांवर किती जास्त प्रेम करतात. जान्हवी कपूर ही खास लूकमध्ये अनंतच्या लग्नात पोहोचली होती. फक्त लग्नच नाहीतर संगीत आणि हळदीमध्येही जान्हवी कपूर खास लूकमध्ये शिखरसोबत पोहोचली होती. आता लग्नामध्येही तर मस्त डान्स करताना शिखर आणि जान्हवी दिसले.
जान्हवी कपूर, शिखर पहाडिया आणि बोनी कपूर यांचा हळदीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. यामध्ये जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याच्यासोबत हळदीच्या कार्यक्रमात पोहोचली होती. यावेळी वडील बोनी कपूर यांना पाहून त्यांना भेटण्यासाठी जान्हवी जवळ आली. यावेळी तिने पिवळ्या रंगाची साडी घातल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसत होते.
जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. नेहमीच हे एकसोबत स्पॉट होताना दिसतात. लवकरच शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर लग्न करणार असल्याचे सातत्याने सांगितले जातंय. मात्र, अजूनही जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी त्यांच्या रिलेशनबद्दल भाष्य केले नाहीये. सुशील कुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया हा आहे.