Sara Ali Khan | काय सांगता? चक्क वाढदिवसाचा केक कट करताना घाबरली सारा अली खान, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Aug 12, 2023 | 9:22 PM

सारा अली खान ही कायमच चर्चेत असणारी बाॅलिवूड अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे सारा अली खान ही सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय दिसते. सारा अली खान हिचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सारा दिसते.

Sara Ali Khan | काय सांगता? चक्क वाढदिवसाचा केक कट करताना घाबरली सारा अली खान, व्हिडीओ व्हायरल
Sara ali khan
Follow us on

मुंबई : जरा हटके जरा बचके हा सारा अली खान (Sara Ali Khan) हिचा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. विशेष म्हणजे सारा अली खान हिचा हा चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना दिसला. सारा अली खान आणि विकी काैशल (Vicky Kaishal) यांची जोडी हिट ठरली. ज्यावेळी मोठ्या बाॅलिवूड स्टारचे चित्रपट (Movie) फ्लाॅप जात होते, त्यावेळी प्रेक्षकांनी जरा हटके जरा बचके या चित्रपटाला प्रेम दिले. सारा अली खान ही सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय असते.

आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सारा अली खान ही दिसते.  नुकताच सारा अली खान हिचा वाढदिवस पारा पडलाय. आता सैफ अली खान याची लेक 28 वर्षांची झालीये. विशेष म्हणजे सारा अली खान हिने आपला वाढदिवस भाऊ इब्राहिम आणि आईसोबत साजरा केला आहे.

आता सारा अली खान हिच्या वाढदिवसाचे काही फोटो आण व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ आणि फोटोमध्ये दिसत आहे की, सारा अली खान ही वाढदिवसाचा केक पाहून चक्क घाबरत आहे. यामुळे चाहतेही हैराण झाले.

हे फोटो पाहून चाहतेही हैराण झाले असून अनेकांनी थेट म्हटले की, असा कोणता केक आहे की, सारा केक पाहून घाबरली? आता याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सारा अली खान हिचे चाहते तिला मोठ्या प्रमाणात वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

Sara ali khan

सारा अली खान हिच्या मैत्रीणीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, कशालाही न घाबरणारी सारा केकला घाबरत आहे. आता हिच पोस्ट व्हायरल होत आहे. सारा अली खान ही काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये रस्त्याच्याकडेला असलेल्या दुकानांवर खरेदी करताना दिसली. मुंबईमध्ये पावसाचा आनंद घेण्यासाठी सारा अली खान बाहेर पडली होती.

सारा अली खान आणि विकी काैशल हे त्यांच्या जरा हटके जरा बचके या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी थेट जयपूरला पोहचले होते. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान ही मुंबईमध्ये आलिशान गाड्या सोडून रिक्षाने फिरताना दिसली होती. याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अनेकांनी सारा अली खान हिचे हे व्हिडीओ पाहून तिचे काैतुक करण्यास सुरूवात केली होती.