अंकिता लोखंडे हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. अंकिता लोखंडेची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विकी जैन याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर अंकिता लोखंडे ही अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला डेट करत होती. अंकिता लोखंडे हिने फक्त टीव्ही मालिकांमध्येच नाही तर चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बॉसच्या घरात पोहोचली होती. मात्र, म्हणावा तसा गेम खेळण्यात अंकिता लोखंडे हिला यश मिळाले नाही.
नुकताच अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन याचा वाढदिवस झालाय. या वाढदिवसानिमित्त खास पार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे ही चांगलीच भडकल्याचे बघायला मिळतंय.
वाढदिवसाच्या पार्टीमध्ये अंकिता लोखंडे ही विकी जैन याच्यावर नाही तर त्याचा मित्र संदीप सिंह याच्यावर भडकली होती. संदीप सिंह याने केलेले कृत्य पाहून अंकिता लोखंडे स्वत:ला रोखू शकली नाहीये. काळ्या रंगाचा शिमरी ड्रेसमध्ये अंकिता लोखंडे हिचा जबरदस्त असा लूक दिसत होता. पार्टीमधून अंकिता लोखंडे आणि विकी बाहेर पडले.
त्यावेळी अंकिता आणि विकीसोबत त्याचा मित्र संदिप सिंह हा देखील मागे आला. यावेळी संदिप सिंह याने थेट अंकिता लोखंडे हिच्या डोक्यावरील ड्रेसची टोपी त्याने खाली ओढली. डोक्यावरील टोपी खाली ओढल्यानंतर अंकिता लोखंडे ही चांगलीच संतापल्याचे बघायला मिळतंय. तिने लगेचच तिच्या ड्रेसची टोपी घातली, त्यावेळी ती रागात होती.
संदिप सिंह याचे हे करणे अंकिता लोखंडे हिला अजिबातच आवडले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता याचेच काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही अंकिता लोखंडे दिसते.