Video | सपना चौधरी हिच्या निशाण्यावर सचिन मीना आणि सीमा हैदर, व्हिडीओ शेअर करत उडवली खिल्ली, म्हणाली…

| Updated on: Jul 28, 2023 | 8:54 PM

सपना चौधरी ही कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे सपना चौधरी ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे. सपना चौधरी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. सपना चौधरी ही आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करताना दिसते.

Video | सपना चौधरी हिच्या निशाण्यावर सचिन मीना आणि सीमा हैदर, व्हिडीओ शेअर करत उडवली खिल्ली, म्हणाली...
Follow us on

मुंबई : हरियाणी डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) ही गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे सपना चौधरी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. सपना चौधरी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना सपना चौधरी ही दिसते. काही दिवसांपूर्वीच काॅमेडियन भारती सिंह हिला भेटण्यासाठी सपना चौधरी ही मुंबईमध्ये आली होती. यावेळी तिने खास फोटोशूट (Photoshoot) देखील केले. सपना चौधरी हिला भारतीच्या मुलाला पाहून आपल्या स्वत:च्या मुलाची आठवण आली. यावेळी सपना चौधरी ही भावूक झाल्याचे देखील बघायला मिळाले.

कुठेही तेरी आख्या का यो काजल हे गाणे ऐकले की, लगेचच आपल्याला सपना चौधरी हिची आठवण येते. सपना चौधरी ही नेहमीच चर्चेत असते. विशेष म्हणजे सपना चौधरी ही बिग बाॅसमध्येही सहभागी झाली होती. धमाकेदार गेम खेळताना सपना चौधरी ही बिग बाॅसच्या घरात दिसली होती. सपना चौधरी हिची बिग बाॅसनंतर फॅन फाॅलोइंग देखील वाढली आहे.

नुकताच आता सपना चौधरी हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता या व्हिडीओमुळे सपना चौधरी ही तूफान चर्चेत आलीये. या व्हिडीओमध्ये सपना चौधरी ही चक्क सीमा हैदर आणि सचिन मीना यांची खिल्ली उडवताना दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये एक मुलगी ही सीमा हैदर आणि एक मुलगा सचिन मीना झाले आहेत.

सपना चौधरी हिच्या या व्हिडीओमध्ये मागे बसलेला मुलगा हा सचिन मीना आणि मुलगी ही सीमा हैदर यांचा अभिनय करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सपना चौधरी ही फेमस डाॅयलाॅग मारताना दिसत आहे. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. चाहते या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, आज मानले बाबा या सपना चौधरी हिला. दुसऱ्याने लिहिले की, खरोखरच सपना चाैधरी हिने कुठेतरी वस्तुस्थिती दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. तिसऱ्याने लिहिले की, एक गोष्ट नक्कीच आहे की, या सीमा हैदर आणि सचिन मीना यांनी बाजार मांडला आहे.