Bigg Boss OTT 2 | ‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता होणार मालामाल, तब्बल मिळणार इतकी मोठी रक्कम

| Updated on: Jul 18, 2023 | 6:23 PM

बिग बॉस ओटीटी 2 धमाल करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे सीजन सतत चर्चेत आहे. बिग बॉस ओटीटी 2 ला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद हा मिळताना दिसतोय. सलमान खान हा बिग बॉस ओटीटी 2 होस्ट करत आहे. आता शोबद्दलचे मोठे अपडेट पुढे आले आहे.

Bigg Boss OTT 2 | बिग बॉस ओटीटी 2चा विजेता होणार मालामाल, तब्बल मिळणार इतकी मोठी रक्कम
Follow us on

मुंबई : बिग बॉस ओटीटी सीजन 2 (Bigg Boss OTT 2) धमाल करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद हा देखील बघायला मिळतोय. सलमान खान याचा बिग बॉस ओटीटी 2 च्या मंचावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला. या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर सलमान खान (Salman Khan) याच्यावर जोरदार टिका करण्यात आली. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सलमान खान याच्या हातामध्ये सिगारेट दिसत असल्याने लोकांनी त्याला खडेबोल सुनावले. रिपोर्टनुसार बिग बॉस ओटीटी 2 मधील सिगारेटचा व्हिडीओ (Video) व्हायरल झाल्याने सलमान खान याने निर्मात्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला.

इतकेच नाही तर गेल्या विकेंडच्या वारला सलमान खान हा शो होस्ट करताना दिसला नसल्यामुळे अनेकांनी त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळेच सलमान खान याने शोला रामराम केल्याचे म्हटले होते. अनेकांनी चक्क बिग बॉस ओटीटी 2 च्या मंचावर सलमान खान हा सिगारेट ओढताना दिसल्याने त्याच्यावर टिका केली.

आता बिग बॉस ओटीटी 2 च्या फिनालेबद्दल अपडेट आले असून आॅगस्टमध्ये बिग बॉस ओटीटी 2 चा फिनाले होणार आहे. विशेष म्हणजे बिग बॉस ओटीटी 2 च्या विजेत्याला तगडे पैसे देखील मिळणार आहेत. 25 लाख रूपये बिग बॉस ओटीटी 2 च्या विजेत्याला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

बिग बॉस ओटीटी 2 च्या घरात आकांक्षा पुरी ही देखील सहभागी झाली होती. मात्र, बिग बॉस ओटीटीच्या घरात असताना आकांक्षा पुरी ही मोठ्या वादात सापडली. थेट एका टास्टमध्ये लिपलाॅक करताना आकांक्षा पुरी ही दिसली. विशेष म्हणजे घरातील सदस्यांसमोरच नाही तर चक्क कॅमेऱ्यासमोर आकांक्षा पुरी हिने लिपलाॅक केले.

आकांक्षा पुरी हिच्या लिपलाॅकनंतर अनेकांनी तिच्यावर टिका करण्यासही सुरूवात केली. विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा आकांक्षा पुरी हिला खडेबोल सुनावताना दिसला होता. आलिया भट्ट हिची बहीण पूजा भट्ट ही देखील बिग बाॅस ओटीटीमध्ये सहभागी झालीये. एका टास्कमध्ये मोठे खुलासे करताना पूजा भट्ट ही दिसली होती.