भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांचं जगातील महागड्या लग्नापैकी एक लग्न होतं. लग्नासाठी अंबानी कुटुंबियांनी लहान मुलाच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च केला. सर्वांच्या नजरा अनंत – राधिका यांच्या लग्नाकडे होतं. तर त्यांच्या लग्नातील वरात देखील चर्चेचा विषय ठरली. पण आता हीच वरात अडचणीचं कारण होऊ शकते.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या वरातीत अनेक आलिशान विदेशी गाड्या होत्या. मात्र, अनंत अंबानी यांच्या वरातीतील सहभागी आलिशान विदेशी वाहनांवर कारवाई होण्याची चिन्हे आहेत. या ताफ्यातील अनेक वाहन क्रमांकाच्या पाट्या नियम धुडकावून बसविल्याचे आढळून आले. त्यामुळे या वाहनांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर 2023 रोजी खरेदी करण्यात आलेल्या रोल्स रॉयसची नोंदणी मुंबई सेंट्रल आरटीओ कार्यालयातून करण्यात आली आहे. या वाहनाचा वाहन क्रमांक असा ‘एम 01 ईपी 0001’ (AM 01 EP 0001) आहे. मात्र, तो ‘एम 01 ईपी’ असा नमुद करण्यात आला आहे.
वाहन क्रमांक पाटीवर ‘000’ वगळून केवळ ‘1’ असे नमुद करण्यात आले आहे. वाहन क्रमांकात बदल केल्यामुळे मोटार वाहन अधिनियमाच्या कलम 50 नुसार कारवाई करण्यात येते. ती लवकर केली जाईल अशी माहिती आहे. मात्र, काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांवर कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. आता याप्रकरणी पुढे काय होईल पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रिपोर्टनुसार, अनंत अंबानी यांच्या लग्नात अंबानी कुटुंबियांनी त्यांच्या नेटवर्थमधील फक्त 0.5 टक्के पैसे खर्च केले आहेत. म्हणते मुकेश अंबानी यांनी लहान मुलाच्या लग्नात 2,345 कोटी रुपये खर्चे केले आहेत. ? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनंत – राधिका यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. लहान मुलाच्या लग्नासाठी अंबानी कुटुंबियांनी हजारो कोटी रुपये खर्च केले.
अंबानी कुटुंबाने हॉलिवूड सेलिब्रिटी, आंतरराष्ट्रीय उद्योगपती, जागतिक नेते, भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, संपूर्ण बॉलिवूड आणि क्रीडा जगताला आमंत्रणं पाठवली आणि त्यांच्यासाठी खास व्यवस्था देखील केली होती.