बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळत आहे. सलमान खान याच्या मुंबईतील घराबाहेर आज सकाळी पहाटे गोळीबार करण्यात आलाय. सुरूवातीला सांगितले गेले की, हा गोळीबार हवेत करण्यात आलाय. मात्र, त्यानंतर हे स्पष्ट झाले की, हा गोळीबार सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या गॅलरीच्या भागात झाला. फक्त हेच नाही तर एक गोळी थेट सलमान खान याच्या घरात गेल्याचे देखील सांगितले जातंय. या सर्व प्रकारानंतर सलमान खान याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय.
गेल्या काही दिवसांपासून सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. आता सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याने घेतलीये. एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आलीये.
सलमान खान याच्या घरावर पहाटे 4.55 ला गोळीबार करण्यात आलाय. गोळीबार झाला त्यावेळी सलमान खान हा नेमका कुठे होता, याबद्दल सातत्याने प्रश्न केला जातोय. यावेळी पोलिसांकडून हे स्पष्ट करण्यात आले की, ज्यावेळी गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता आणि तो आपल्या संपूर्ण कुटुंबियांसोबत होता.
सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाला हे समजल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय. या गोळीबारानंतर सलमान खान याने कोणतेच भाष्य केले नाहीये. परंतू या गोळीबारानंतर सलमान खान याचे वडील सलिम खान यांनी मोठे भाष्य केले. त्यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट जाणवले की, हे फक्त प्रसिद्धीसाठी या लोकांकडून केले जातंय.
आता पोलिसांनी या प्रकरणात शोध घेण्यास सुरूवात केलीये. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना देखील दिसतोय. दोनजण गाडीवर आल्याचे या व्हिडीओवरून स्पष्ट दिसतंय. मात्र, व्हिडीओमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांचे चेहरे हे दिसत नाहीत. मुंबई पोलिस हे आरोपींचा कसून शोध घेत असल्याचे देखील सांगितले जात आहे. या प्रकरणातील तपास करण्यासाठी पोलिसांकडून 20 पथके तयार करण्यात आलीत.