शाहरुख खान याच्यासह चाहत्यांना मोठा झटका, डंकी चित्रपटाबद्दल हैराण करणारे अपडेट

| Updated on: Nov 30, 2023 | 3:15 PM

शाहरुख खान याच्यासाठी यंदाचे हे वर्षे अत्यंत खास ठरले. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. आता चाहते त्याच्या डंकी चित्रपटाची वाट पाहत आहेत.

शाहरुख खान याच्यासह चाहत्यांना मोठा झटका, डंकी चित्रपटाबद्दल हैराण करणारे अपडेट
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान याचे हे चित्रपट धमाके करताना दिसत आहेत. चाहत्यांमध्ये शाहरुख खान याच्या आगामी डंकी या चित्रपटाबद्दलची कमालीची क्रेझ बघायला मिळतंय. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आता चाहत्यांसाठी निराशाजनक अशी बातमी आलीये. शाहरुख खान याच्या डंकी चित्रपटाबद्दल एक अत्यंत मोठे असे अपडेट बघायला मिळतंय. मात्र, यानंतर चाहत्यांमध्ये निराशा आहे.

शाहरुख खान याचा डंकी हा चित्रपट 21 डिसेंबरला रिलीज होतोय. शाहरुख खान याचा डंकी आणि प्रभास याचा सालार चित्रपट एकाच दिवशी रिलीज होऊ शकतात. याचा फायदा आणि तोटा कोणाला होणार हे पाहण्यासारखे ठरणार. शाहरुख खान याच्या डंकी चित्रपटाचे ट्रेलर 7 डिसेंबर रोजी रिलीज होणार होते. मात्र, अचानक ट्रेलरच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आलाय.

आता डंकी चित्रपटाचा ट्रेलर हा 7 डिसेंबरला रिलीज होणार नाहीये. चाहते या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहताना दिसले. मात्र, आता ट्रेलर कधी रिलीज होणार याबद्दल काही माहिती मिळू शकली नाहीये. आता ही चर्चा आहे की, सालार चित्रपटामुळे डंकी चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल होऊ शकतो. डंकी हा रिलीज होणारा शाहरुख खान याचा यंदाचा तिसरी चित्रपट आहे.

वर्षाच्या सुरूवातीला शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने मोठा धमाका केला. इतकेच नाही तर शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण चित्रपट ठरला. पठाणनंतर शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने देखील तगडी कमाई केल्याचे बघायला मिळाले.

आता चाहते शाहरुख खान याच्या डंकी चित्रपटाची वाट पाहताना दिसत आहेत. शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान आणि मुलगा आर्यन खान हे बाॅलिवूडमध्ये यंदाच पर्दापण करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे खुशी कपूर, अगस्त्य नंदा आणि खुहाना खान हे एकाच चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसणार आहेत.