शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खान याच्या आरोग्याबाबत मोठे अपडेट, व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्याला..

| Updated on: Jan 23, 2024 | 3:36 PM

बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सैफ अली खान याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आलीये. यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय. सैफ अली खान याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खान याच्या आरोग्याबाबत मोठे अपडेट, व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्याला..
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सैफ अली खान याला चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाली. थेट त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. हेच नाही तर सैफ अली खान याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. सैफ अली खान याच्या शस्त्रक्रियेबद्दल कळताच चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळाले. चाहते हे सैफ अली खान याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करताना देखील दिसले. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केल्या.

सैफ अली खान याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया ही 22 जानेवारी 202 4 रोजी करण्यात आली. ‘देवारा’ चित्रपटाच्या अॅक्शन सीनदरम्यान सैफ अली खान याला मोठी दुखापत झाली. फक्त गुडघ्यालाच नाही तर सैफ अली खान याच्या खांद्याला देखील दुखापत झाली. यानंतर त्याला थेट कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आता सैफ अली खान याच्या आरोग्याबद्दल अत्यंत मोठे अपडेट हे पुढे आलंय. सैफ अली खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये सैफ अली खान याच्यासोबत करीना कपूर खान ही देखील दिसत आहे. सैफ अली खान याच्या खांद्याला फॅक्चर देखील दिसतंय.

आता सैफ अली खान याची तब्येत व्यवस्थित असून तो कोकिलाबेन रुग्णालयातून घरी निघाला आहे. सैफ अली खान यावेळी पापाराझी यांना पाहून धन्यवाद मानता देखील दिसत आहे. हेच नाही तर करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे दोघेही पोझ देताना देखील दिसत आहेत. आता सैफ अली खान याचा हात व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सैफ अली खान याला अशाप्रकारे पाहून चाहते देखील खुश झाले आहेत. एका मुलाखतीमध्ये सैफ अली खान याला या दुखापतीबद्दल सांगितले आहे. सैफ अली खान म्हणाला की, या दुखापतीनंतर त्रास वाढत होता. मी नवीन वर्षांचा स्वागत करण्यासाठी कुटुंबियांसोबत गेले होतो, त्यावेळी देखील मला खूप जास्त त्रास होत होता.