‘बिग बॉस सीजन 18’ला सुरूवात झालीये. विशेष म्हणजे हे सीजन चांगलेच चर्चेत आहे. प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉसच्या घरात दाखल झाले होते. मात्र, अचानक ते बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनेक मोठे खुलासे करताना गुणरत्न सदावर्ते हे दिसले. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान हा बिग बॉसला होस्ट करताना दिसतोय. मध्यंतरी चर्चा होती की, सलमान खान हा बिग बॉस 18 ला होस्ट करताना दिसणार नाहीये. मात्र, त्यानंतर लगेचच सलमान खान हा आगामी सीजनचा प्रोमो शूट करताना दिसला. धमाकेदार असा लीक सलमान खान याचा बिग बॉस 18 मध्ये दिसतोय.
बाबा सिद्दीकी यांच्यावर ज्यावेळी गोळीबार करण्यात आला. त्यावेळी सलमान खान हा बिग बॉस सीजन 18 चे विकेंडच्या वारचे शूटिंग करत होता. त्याला जसे समजले की, बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला तसेच त्याने थेट लीलावती रूग्णालय गाठले. हेच नाही तर स्वत:च्या जीवाला धोका असताना देखील सलमान खान बाबा सिद्दीकी यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचला.
सतत सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. बिश्नोई गँगकडून आज सकाळी देखील सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली. सलमान खानच्या घराची सतत रेकी बिश्नोई गँगकडून केली जातंंय. बिश्नोई गँगनेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली. जे सलमान खानच्या जवळ असतील ते आपले दुश्मन असल्याचे थेट सांगताना बिश्नोई गँगकडून सांगण्यात आलंय.
बिश्नोई गँगकडून सलमान खानच्या हत्येचा प्लॅनिंग सतत बनवले जातंय. आता सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ ही करण्यात आलीये. मुंबई पोलिस त्याच्या घराबाहेर मोठ्या संख्येने आहेत. सलमान खानच्या पनवेल येथील फॉर्महाऊसची देखील सुरक्षा वाढवली आहे. फॉर्महाऊसच्या आतमध्ये आणि बाहेरही पोलिस आहेत.
सलमान खानच्या सुरक्षेच्या कारणामुळे तो बिग बॉस सीजन 18 चे देखील काही दिवस शूटिंग करणार नसल्याचे रिपोर्टमध्ये सांगितले जातंय. काही दिवस अनिल कपूर किंवा फराह खान हे शूटिंग करणार असल्याची चर्चा आहे. अगदी गुप्त पद्धतीने पुढील काही दिवसांनंतर सलमान खान बिग बॉसच्या शूटिंगला येईल असे सांगण्यात येतंय. मात्र, सध्या तरी सुरक्षेच्या कारणामुळे तो बिग बॉसचे करू शकणार नसल्याचे सांगण्यात आलंय.