बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने करिअरच्या सुरुवातीलाच अभिनयातून आणि आपल्या सौंदर्याने स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. ज्या चित्रपटात ऐश्वर्या असेल तर तो चित्रपट हिट होईल असे म्हटले जात होते. पण जेव्हा तिने पहिल्यांदा चित्रपटात किसिंग सीन दिला तेव्हा गदारोळ झाला होता. ऐश्वर्याने तिचा सुपरहिट चित्रपट ‘धूम २’ मध्ये पहिल्यांदा किसिंग सीन दिला होता. हा सीन तिने हृतिक रोशनसोबत चित्रित केला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ऐश्वर्याला कायदेशीर धमक्या मिळू लागल्या होत्या.
खुद्द ऐश्वर्यानेच हा दावा केला होता की, ऐश्वर्याने डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते – “मी ‘धूम’ चित्रपटात फक्त एकदाच हा सीन केला होता आणि तो चर्चेचा विषय बनला होता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या सीनमुळे मला काही कायदेशीर नोटिसाही मिळाल्या आहेत.”
ऐश्वर्या पुढे म्हणाली होती की, “लोक म्हणाले- तू प्रतिष्ठित आहेस, आमच्या महिलांसाठी तू एक उदाहरण आहेस, तू तुझे आयुष्य अशा आदर्श पद्धतीने जगले आहेस, तुला ऑनस्क्रीन किस करताना पाहून लोकांना चांगले वाटत नाहीये, मग तू असे का केलेस??”
ऐश्वर्या पुढे म्हणाली, ‘मला धक्का बसला, मी फक्त एक अभिनेत्री आहे, मी माझे काम करत आहे आणि इथे मला दोन-तीन तासांच्या चित्रपटातील काही सेकंदांच्या सीनसाठी स्पष्टीकरण देण्यास सांगितले जात आहे.’
ऐश्वर्याने लग्नाच्या सहा महिने आधी हा सीन चित्रित केला होता आणि या चित्रपटात तिच्यासोबत अभिषेक बच्चनही होता. ‘धूम 2’ हा 26 नोव्हेंबर 2006 रोजी रिलीज झाला होता. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न 20 एप्रिल 2007 रोजी झाले होते.
ऐश्वर्याच्या या सीनमुळे बच्चन कुटुंबही तिच्यावर नाराज झाल्याचे बोलले जाते. मात्र, लग्नानंतर ऐश्वर्याने पुन्हा हृतिकसोबत ‘जोधा अकबर’ आणि ‘गुजारिश’मध्ये काम केले आणि दोघांमध्ये रोमँटिक सीन्सही दिले.
अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या घटस्फोटांच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या आता वेगवेगळे राहत असल्याची माहिती आहे. आता ते एकत्र ही दिसत नाहीत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे. पण दोघांनी ही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.