झगमगत्या विश्वातील अनेक सेलिब्रिटी तीन – चार मुलांचे आई – वडील आहे. पण सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती अभिनेत्री एक दोन नाही तर, तब्बल 36 मुलांची आई आहे. त्यामध्ये अभिनेत्रीला 34 मुली आणि दोन मुलं आहेत. लग्नाआधी अभिनेत्री 34 मुलींची आई झाली, त्यानंतर अभिनेत्रीने परदेशातील उद्योजकासोबत लग्न केलं आणि सेरोगेसीच्या माध्यमातून दोन मुलांचं जगात स्वागत केलं. तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?
लग्नापूर्वी 34 मुलांची आई बनलेल्या या सुपरस्टार अभिनेत्रीने एका परदेशातील उद्योजकासोबत लग्न केलं. परदेशी व्यावसायिकाशी लग्न केल्यानंतर ही अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर झाली आणि तिने परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मात्र आता अनेक वर्षानंतर ही अभिनेत्री सनी देओलच्या सिनेमातून पुनरागमन करणार आहे.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे. ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री प्रिती झिंटा आहे. प्रिती हिला आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. प्रिती कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्रिती झिंटाने 2009 मध्ये तिचा 34 वा वाढदिवस अतिशय वेगळ्या अंदाजात बनवला.
वाढदिवशी प्रिती हिने ऋषिकेशमधील मदर मिरॅकल अनाथाश्रमातून 34 मुलींना दत्तक घेतलं. ज्या मुलींना आई-वडील नव्हते अशा मुलींना प्रितीने दत्तक घेतलं आहे. एक मुलाखतीत प्रिती या गोष्टीचा खुलासा देखील केला होता. अभिनेत्री म्हणाली होती, ‘मी 34 मुलींना दत्तक घेतलं आहे. मी त्यांचं शिक्षण, अन्न, कपडे सर्व गोष्टींची जबाबदारी घेतली आहे. आता त्या माझ्या मुली आहेत. मी वर्षातून दोनदा मुलींना भेटण्यासाठी जाते…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.
प्रिती झिंटा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, 2016 मध्ये अमेरिकेतील उद्योजक जीन गुडइनफ याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर प्रिती झिंटा लॉस एंजेलिसला शिफ्ट झाली. लग्नाच्या 5 वर्षानंतर प्रिती झिंटा 2021 मध्ये सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई झाली. आता अनेक वर्षांनंतर अभिनेत्री ‘लाहोर 1947’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.