झगमगत्या विश्वाचं आकर्षण प्रत्येकाला असतं. रॉयल लाईफस्टाईल, महागड्या गाड्या, भव्य घरे… अशा अनेक कारणांमुळे सेलिब्रिटी चर्चेत असतात. पण बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या इच्छेविरोधात बॉलिवूडमध्ये आल्या आणि स्वतःचं इंडस्ट्रीमध्ये भक्कम स्थान निर्माण केलं. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, तिचं खास कनेक्शन अभिनेता संजय दत्त याच्यासोबत आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर, दिवंगत अभिनेत्री नरगिस दत्त आहेत.
नरगिस दत्त यांच्या आई तेव्हा देहविक्रीचा व्यवसाय करायच्या आणि ब्राह्मण वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता.नरगिस यांचं खरं नाव फातिमा राशिद असं होतं. नरगिस यांची आई जद्दनबाई फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय कंपोजर होत्या. पण एकेकाळी जद्दनबाई प्रसिद्ध तवायफ होत्या. नरगिस यांच्या वडिलांचं नाव मोहनचंद उत्तमचंद त्यागी असं होतं. जे एक ब्राह्मण उद्योजक होते.
रिपोर्टनुसार, जद्दनबाई यांच्यासोबत लग्न करण्यासाठी मोहनचंद उत्तमचंद त्यागी यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. मोहनचंद उत्तमचंद त्यागी यांच्यासोबत जद्दनबाई यांचं तिसरं लग्न होतं. दोघांना एक मुलगी होती आणि ती मुलगी म्हणजे नरगीस…
नरगीस यांना डॉक्टर व्हायचं होतं. पण कर्जाची परतफेड करण्यासाठी जद्दनबाई यांनी मुलगी नरगिस हिला सिनेमांमध्ये काम करण्यास सांगितलं. नरगीस यांनी अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना नरगिस यांनी अभिनेते सुनील दत्त यांच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर नरगीस यांनी अभियन विश्वाचा निरोप घेतला.
नरगिस यांनी वयाच्या 51 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नरगीस यांचं निधन कर्करोगामुळे झालं 3 मे 1981 रोजी नरगीस यांनी अखेरचा श्वास घेतला. संजय दत्त कायम आईबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतो. सोशल मीडियावर अभिनेता आईसोबत फोटो देखील पोस्ट करत असतो.
सोशल मीडियावर देखील संजय दत्त याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. संजय दत्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेत्याने तीन लग्न केली आहे. अभिनेता आता तिसऱ्या पत्नीसोबत आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.