अभिनेत्याच्या आयुष्यातील कठीण दिवस, 150 रुपयांमध्ये धुणीभांडी करण्याची आली वेळ, तुम्हाला नाही बसणार विश्वास

| Updated on: Sep 23, 2024 | 1:48 PM

Bollywood Actor Life: एका घटनेमुळे अभिनेत्याच्या आयुष्याचं होत्याचं नव्हतं झालं, ढाब्यावर 150 रुपयांमध्ये धुणीभांडी करण्याची आली वेळ, अभिनेत्याच्या संघर्ष होता अत्यंत खडतर, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याची चर्चा...

अभिनेत्याच्या आयुष्यातील कठीण दिवस, 150 रुपयांमध्ये धुणीभांडी करण्याची आली वेळ, तुम्हाला नाही बसणार विश्वास
sanjay mishra
Follow us on

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान… यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर करण्याची अनेकांची इच्छा असते. पण सर्वांची ही इच्छा पूर्ण होत नाही. पण बॉलिवूडमधील असा एक अभिनेता आहे, ज्याला प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी तर मिळाली. पण अभिनेत्याच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. अभिनयात अव्वल असताना देखील अभिनेत्याला ऋषिकेश येथे जावून एका ढाब्यावर धुणीभांडी करण्याची वेळ आली.

अभिनेत्याने वयाच्या 30 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण 24 वर्षांनंतर देखील अभिनेत्याला महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली नाही. पण अभिनेत्याच्या आयुष्यात फक्त संकटं आली. एवढंच नाही तर, अभिनेत्याने इंडस्ट्रीपासून नातं संपवण्याचा देखील निर्णय घेतला होता.

सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ते अभिनेते दुसरे तिसरे कोणी नसून अभिनेते संजय मिश्रा आहेत. 1963 मध्ये बिहारमधील दरभंगा येथे जन्मलेल्या संजय मिश्रा यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेऊन अभिनयाची आवड जोपासली. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवातीची वर्षे सोपी नव्हती कारण त्यांनी जाहिराती आणि टेलिव्हिजनमध्ये छोट्या भूमिका केल्या.

छोट-छोट्या भूमिका करत असताना 1995 च्या सुरुवातीला संजय मिश्रा यांना अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘ओह डार्लिंग! ये है इंडिया!’ सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. ‘ओह डार्लिंग! ये है इंडिया!’ सिनेमात भूमिका बजावल्यानंतर संजय यांनी मागे वळून पाहिलं नाही. ‘सत्या’ आणि ‘दिल से’ यांसारख्या सिनेमांमध्ये देखील भूमिका बजावली. पण तरी देखील संजय मिश्रा प्रसिद्धी झोतात आलं नाहीत.

संजय मिश्रा यांनी ‘गोलमाल’, ‘बंटी और बबली’ आणि ‘ऑल द बेस्ट’ यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारली आणि बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. यशाची पायरी चढत असताना अभिनेत्याच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. संजय मिश्रा यांच्या वडिलांचं निधन झालं. अशात निराश झालेल्या संजय मिश्रा यांनी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.

अखेर संजय मिश्रा यांनी ऋषिकेश याठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. ऋषिकेश याठिकाणी संजय एका ढाब्यामध्ये धुणीभांडी करु लागले. ज्यासाठी त्यांना फक्त 150 रुपये मिळायचे. दरम्यान, ‘गोलमान’ सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी त्यांनी मोठा खुलासा केला.

संजय मिश्रा म्हणाले होते, ‘मन:शांतीसाठी यामध्ये साधेपणा शोधण्याचा प्रयत्न केला… त्यानंतर काही दिवसांत मुंबईत परतलो…’ मुंबईत परतल्यानंतर संजय मिश्रा यांनी पुन्हा अभिनय विश्वात पदार्पण केलं. आज संजय मिश्रा यांना कोणत्या ओळखीची गरज नाही. त्यांच्या चाहत्यांची संख्या आज फार मोठी आहे.