मुंबई | 30 डिसेंबर 2023 : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्याना खासगी आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. वैवाहिक आयुष्याचं सुख अभिनेत्रींना अनुभवता आलं नाही. म्हणून झगमगत्या विश्वातील काही अभिनेत्रींनी पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि विवाहबंधनातून मुक्त झाल्या. घटस्फोटानंतर अभिनेत्रींनी दुसरं लग्न न करता करियरला प्राधान्य दिलं आणि इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. या अभिनेत्रींच्या यादीमध्ये फक्त अभिनेत्री मलायका अरोरा नाही तर, अन्य अभिनेत्रींचा देखील समावेश आहे.
अभिनेत्री मलायका अरोरा सध्या ‘सिंगल मदर’ म्हणून मुलगा अरहान याचा सांभाळ करत आहे. मलायका हिने 1998 मध्ये अभिनेता अरबाज खान याच्यासोबत लग्न केलं. पण लग्नाच्या 18 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर मलायकाने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. सध्या मलायका ‘झलक दिखला जा 11’ या डान्स रिऍलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे.
घटस्फोटानंतर करिअरवर लक्ष केंद्रित करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत दुसऱ्या स्थानी दाक्षिणात्य सिनेविश्वातील अभिनेत्री समंथा प्रभू हिचं नाव आहे. समंथा आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी 2017 मध्ये मोठ्या थाटात गोवा याठिकाणी लग्न केलं. पण लग्नाच्या 4 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर ‘पुष्पा’ सिनेमातून अभिनेत्रीने झगमगत्या विश्वात पुन्हा दमदार पदार्पण केलं.
अभिनेत्री किर्ती कुल्हारी हे आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’, ‘मिशन मंगल’, ‘पिंक’ यांसारख्या अनेक लोकप्रिय सिनेमे आणि वेब सीरिजमध्ये किर्ती दिसली आहे. पडद्यावर अभिनेत्रीला यश मिळालं. पण अभिनेत्रीचं खासगी आयुष्य फेल ठरलं. अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यात अनेक संकटं आली.
अभिनेत्री किर्ती कुल्हारी हिने 2016 मध्ये अभिनेता साहिल सहगलसोबत लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. 2021 मध्ये किर्ती कुल्हारी आणि साहिल सहगल यांचा घटस्फोट झाला. यानंतर कीर्तीने तिचे संपूर्ण लक्ष करिअरवर केंद्रित केले आणि आज ती इंडस्ट्रीत खूप यशस्वी आहे.
प्रसिद्ध आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिचा देखील घटस्फोट झाला आहे. अभिनेत्रीने गोल्फर ज्योती रंधावा याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या दोन वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर चित्रांगदा अनेक सिनेमांमध्ये दिसली.