मुंबई | 25 डिसेंबर 2023 : झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अनेक संकटांचा सामना करत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. प्रत्येक भूमिकेला योग्य तो न्याय देत अभिनेत्रींनी चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. एवढंच नाही तर, अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये भक्कम केलेलं स्थान कायम ठेवण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या. आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींनी मोठ्या पडद्यावर देहविक्रीचा व्यापार करणाऱ्या महिलांची भूमिका साकारली आहे. ज्यामुळे अभिनेत्रींना लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. जाणून घेऊया या अभिनेत्रींबद्दल…
अभिनेत्री आलिया भट्ट : बॉलिवूड अभिनेत्रींच्या यादीक आलिया भट्ट अव्वल स्थानी आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्रीने ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. सिनेमात अभिनेत्री देहविक्रीचा व्यापार करणाऱ्या महिलेची भूमिका साकारली होती. भूमिकेसाठी अभिनेत्रीला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत देखील करण्यात आलं.
अभिनेत्री कंगना रनौत : कंगना हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अभिनेत्रीने ‘रज्जो’ सिनेमात देहविक्रीचा व्यापार करणाऱ्या महिलेची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीने साकारलेल्या भूमिकेचं सर्वच स्तरातून कौतुक झालं.
अभिनेत्री करीना कपूर : देहविक्रीचा व्यापार करणाऱ्या महिलांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री करीना कपूर हिचं देखील नाव आहे. ‘चमेली’ सिनेमात अभिनेत्रीने देहविक्रीचा व्यापार करणाऱ्या महिलेची भूमिका साकरली होती. करीनाच्या भूमिकेला चाहते आजही विसरु शकलेले नाहीत.
अभिनेत्री विद्या बालन : बॉलिवूडच्या दमदार अभिनेत्रींपैकी एक म्हणजे विद्या बालन. अनेक तडफदार भूमिकांना न्याय दिलेल्या विद्या बालन हिने ‘बेगम जान’ सिनेमात देहविक्रीचा व्यापार करणाऱ्या महिलेची भूमिका साकारली होती. सिनेमा 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता.
आलिया भट्ट, करीना कपूर, कंगना रनौत, विद्या बालन यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी मोठ्या पडद्यावर देहविक्रीचा व्यापार करणाऱ्या महिलेची भूमिका साकारली आणि चर्चेत राहिल्या. अभिनेत्रींच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.