महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान, न्यायमूर्ती हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर मल्याळम इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. रिपोर्ट समोर आल्यानंतर अभिनेत्री आणि इंडस्ट्रीतील अन्य महिला त्यांच्यावर झालेले शारीर, लैंगिक आणि मानसिक शोषण यावर आवाज उठवताना दिसत आहे. यामुळे अनेक पुरुष कलाकारांवर गंभीर आरोप देखील करण्यात आलं आहेत. यावर आता अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर यांनी मोठा खुलासा केला आहे.
खुशबू सुंदर यांनी एक्सवर मोठी पोस्ट लिहित महिलांना स्वतःवर झालेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यास सांगितलं आहे. ‘त्या महिलांच्या धाडसाचे कौतुक करावे लागेल ज्यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम राहून विजय मिळवला आहे. शोषण, लैंगिक अनुकूलता मागणे, स्त्रियांना दडपून टाकता यावे म्हणून तडजोड करायला सांगणे. करियरचं आमिष दाखवत त्यांच्यावर अत्याचार करणे… हे सर्व क्षेत्रात घडत असतं..’
पुढे खुशबू सुंदर म्हणाल्या, ‘फरक पडत नाही यावर तुम्ही कधी व्यक्त व्हाल. फक्त आवाज उठवण्याची गरज आहे. असं केल्यास त्या घटनेतून स्वतःला सावरण्याची तुम्हाला शक्ती मिळेल आणि यावर चौकशी होऊ शकले. पीडितांना दोषी ठरवू नका… असं आवाहन देखील खुशबू यांनी केलं आहे.
‘पीडितांना दोषी मानू नका, ‘तू असं का केलं?’ असा प्रश्न देखील तुम्ही विचारु नका. असा प्रश्न विचारल्यात पीडित महिलेच्या मनावर वाईट परिणाम होईल. कठीण काळात महिलांना कायम पाठिंब्याची गरज असते…’ असं देखील खुशबू सुंदर म्हणाल्या.
एवढंच नाही तर, खुशबू यांनी स्वतःबद्दल देखील मोठा खुलासा केला. खुशबू सुंदर यांच्या वडिलांनीच त्यांच्यावर अत्याचार केले. ‘मला लोकं विचारतात, तुझ्या वडिलांनी तुझ्यावर अत्याचार केले आहेत. तेव्हा तू व्यक्त का नाही झाली. मला मान्य आहे, मी आधी बोलायला हवं होतं. पण माझ्यासोबत जे काही झालं ते करियर पुढे जावं म्हणून झालं नाही. जे झालं ती कोणत्याही प्रकारची तडजोड नव्हती… ज्या हातांनी माझं रक्षण व्हायला हवं होतं, त्याच हातांनी माझ्यावर अत्याचार केले आहेत…’ असं अभिनेत्री म्हणाल्या.
पुढे अभिनेत्रीने पुरुषांना देखील पीडित महिलांना पाठिंबा देण्यासाठी आग्रह केला. ‘ही डोळे उघडणारी घटना आहे. अत्याचार याठिकाणी थांबले हवे… महिलांनी समोर येण्याची गरज आहे. कायम लक्षात ठेवा आयुष्यात निवड असते. तुमच्याकडून मिळालेला नकार हा सर्वच बाजूने असलेला नकार आहे… , सन्मान आणि आदर यांच्याशी कधीही तडजोड करू नका. कधीच नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाल्या.