मुंबई | 23 डिसेंबर 2023 : नशीब बदलायला वेळ नाही लागत… असं आपण कायम म्हणतो… पुढे प्रश्न पडतो.. नशीब बदलेल पण कधी? सांगायचं झालं तर, संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. यश – अपयश तर.. फार पुढची गोष्ट आहे. फक्त सर्व सामान्य नाही तर, सेलिब्रिटींना देखील अनेक संकटांचा सामना करावा लागतो. इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येक कलाकार प्रयत्न करतो. काही कलाकारांना यश देखील मिळतं.. पण मिळालेलं यश फार काळ टिकत नाही. असंच काही झालं आहे, एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत. वयाच्या 20 व्या वर्षी अभिनेते अरविंद यांनी अभिनय विश्वात पदार्पण केलं. सुरुवातील अरविंद यांनी ‘मणी रत्नम ‘ सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
पहिल्या सिनेमानंतर, अरविंद यांनी ‘राजा’ आणि ‘बॉम्बे’ सिनेमात मबत्त्वाची भूमिका साकारली. अरविंद स्वामी यांच्या अभिनय कारकिर्दीत एक वेळ अशी आली जेव्हा त्यांना रजनीकांत आणि कमल हासन यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांचे उत्तराधिकारी मानलं जात होतं. पण आयुष्यात वाईट वेळ देखील कायम येते.
कालांतराने अरविंद यांचे सिनेमे एकापाठोपाठ एक फ्लॉप झाले. बॉक्स ऑफिसवर सिनेमे फ्लॉप ठरत असल्यामुळे निराश झालेल्या अरविंद यांनी अभिनयाचा निरोप घेतला. त्यानंतर अरविंद यांनी व्यवसायाकडे आपला मोर्च वळवला. सुरुवातीला अरविंद यांनी वडिलांचा व्यवसाय हाती घेतला. त्यानंतर त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली.
अभिनय सोडल्यानंतर, अरविंद यांनी वडिलांची कंपनी व्हीडी स्वामी अँड कंपनी सांभाळण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी टॅलेंट मॅक्सिमम नावाने स्वतःची कंपनी सुरू केली, त्यानंतर 2005 मध्ये अरविंद यांचा मोठा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर त्यांच्यावर 4 ते 5 वर्ष उपचार सुरु होते. असं असून देखील त्यांनी व्यवसाय सुरु ठेवला.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अनेक संकटांचा सामना केल्यानंतर अरविंद यांच्या टॅलेंट मॅक्सिमम कंपनीने 2022 मध्ये 3300 कोटी रुपयांची कमाई केली. उद्योग क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर देखील अरविंद यांची अभिनयाची आवड कमी झाली नव्हती. त्यांनी पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
2021 मध्ये, अरविंद स्वामी यांनी अभिनेत्री कंगना रनौत स्टारर तमिळ-हिंदी ‘थलायवी’ सिनेमातून पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अरविंद यांनी सिनेमात कंगनासोबत एमजी रामचंद्रनची भूमिका साकारली होती.