मुंबई : अभिनेत्री नयनतारा हिने आपल्या करिअरची सुरूवात साऊथ चित्रपटांमधून केलीये. आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये नयनतारा हिने अनेक चित्रपटांमध्ये हिट भूमिका केल्या. नयनतारा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नयनतारा ही शाहरूख याच्या जवान चित्रपटामध्ये धमाका करताना दिसली. नुकताच नयनतारा हिचा 39 वा वाढदिवस पार पडलाय. चाहते हे मोठ्या प्रमाणात नयनतारा हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले. नयनतारा हिला वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट मिळाले. विशेष म्हणजे नयनतारा हिला कोट्यवधी रूपयांचे हे गिफ्ट मिळालंय.
नयनतारा हिने सोशल मीडियावर खास दोन फोटो शेअर करत एक पोस्ट शेअर केली. विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त नयनतारा हिला पतीकडून तब्बल 3 कोटीचे गिफ्ट मिळाले. होय तुम्ही खरं ऐकले…नयनतारा हिला पतीने वाढदिवसानिमित्त 3 कोटीचे गिफ्ट दिले. एक अत्यंत खास अशी आलिशान कार नयनतारा हिला गिफ्ट म्हणून देण्यात आलीये.
नयनतारा हिने फोटोमध्ये पूर्ण कार दिसू दिली नाहीये. फक्त कारच्या लोगोचा फोटो शेअर करण्यात आलाय. नयनतारा हिने लिहिले की, घरात तुझे स्वागत आहे सुंदरी…@wikkiofficial माझ्या प्रिय पतीने सर्वात सुंदर भेटवस्तू दिल्याबद्दल खूप धन्यवाद. खूप सारे प्रेम…आता नयनतारा हिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.
नयनतारा हिच्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. नयनतारा हिच्या पतीने जर्मन बेस्ड कार जी मर्सिडीज बेंझ दिलीये. विशेष म्हणजे या कारची किंमत ही 2.70 कोटी ते 3.40 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. ही एक अत्यंत लग्झरी अशी कार आहे. ही कार अनेक रंगामध्ये मिळते. मात्र, नयनतारा हिने नेमक्या कोणत्या रंगाची कार घेतली हे कळू शकले नाही.
नयनतारा ही जवान चित्रपटामध्ये धमाका करताना दिसली. जवान चित्रपटामध्ये काम केल्यापासून ती सतत चर्चेत आहे. इतकेच नाही तर चक्क जवान चित्रपटानंतर नयनतारा हिला सतत चित्रपटांच्या आॅफर येत आहेत. जवाननंतर नयनतारा हिच्या फिसमध्ये मोठी वाढ केल्याचे देखील काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. नयनतारा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे.