मुंबई : शाहरुख खान याचा लेक आर्यन खान (Aryan Khan) हा कायमच चर्चेत असतो. विशेष म्हणजे आता आर्यन खान बाॅलिवूडमध्ये लवकरच पर्दापण करणार आहे. आर्यन खान हा अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार नसून तो डायरेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा देखील आर्यन खान याच्यावर प्रचंड खुश असल्याचे सांगितले जात आहे. आर्यन खान याची वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आर्यन खान याच्या वेब सीरिजच्या प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. आता याबद्दल मोठे अपडेट (Update) पुढे आले आहे.
आर्यन खान याच्या वेब सीरिजचे नाव स्टारडम आहे. विशेष म्हणजे स्टारडमच्या शूटिंगला देखील सुरूवात करण्यात आलीये. वरळीमध्ये वेब सीरिजचे शूटिंग सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच सांगण्यात आलेल्या रिपोर्टनुसार या वेब सीरिजमध्ये रणबीर कपूर हा धमाका करताना दिसणार आहे.
फक्त रणबीर कपूर हाच नाही तर करण जोहर याच्या कॅमिओचा देखील जबरदस्त तडका वेब सीरिजमध्ये बघायला मिळणार आहे. या वेब सीरिजचे काम जोरदार सुरू आहे. काही दिवसांपुर्वीच आलेल्या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले होते की, शाहरुख खान याची झलक देखील लेकाच्या वेब सीरिजमध्ये बघायला मिळणार आहे.
परंतू यावर अजून काहीच खुलासा होऊ शकला नाही. नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार आता बाॅलिवूडचा स्टार रणवीर सिंह हा देखील आर्यन खान याच्या स्टारडम वेब सीरिजमध्ये धमाका करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे असे सांगितले जात आहे की, स्टारडममध्ये रणवीर सिंह हा महत्वाच्या भूमिकेत असणार आहे.
आता चाहते हे आर्यन खान याच्या स्टारडम वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच आर्यन खान आणि शाहरुख खान हे एका जाहिरातीमध्ये एकसोबत काम करताना दिसले होते. यांची जोडी प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडली होती. आर्यन खान हा त्याच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.
फक्त शाहरुख खान याचा लेक आर्यन खान हाच नाही तर शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही देखील लवकरच बाॅलिवूडमध्ये पर्दापण करण्यास तयार आहे. सुहाना खान हिच्या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाले आहे. या चित्रपटात खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील धमाका करताना दिसणार आहेत.