‘ही’ अभिनेत्री हॉटेलमध्ये करायची काम, आज आहे कोट्यवधींची मालकीण; एका सिनेमासाठी घेते तगडं मानधन

| Updated on: Aug 23, 2023 | 12:39 PM

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीचं नशीबच चमकलं... झगमगत्या विश्वात पदार्पण करताच झाली कोट्यवधींची मालकीण... आज तिच्याकडे आहे गडगंज संपत्ती... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खडतर प्रवासाची चर्चा...

ही अभिनेत्री हॉटेलमध्ये करायची काम, आज आहे कोट्यवधींची मालकीण; एका सिनेमासाठी घेते तगडं मानधन
Follow us on

मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : कधी कोणाचं नशीब चमकेल काही सांगता येत नाही… झगमगत्या विश्वाचं आकर्षण प्रत्येकाला असतं… ग्लॅमर, प्रसिद्ध, पैसा… प्रत्येकाला हवा असतो… पण प्रत्येकाच्या नशीबात ही गोष्ट नसते. काही लोकांना यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते, तर काहींच्या मेहनतीला मात्र नशिबाची साथ मिळते… असंच काही झालं बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत… बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री हॉटेलमध्ये काम करायची.. त्यानंतर तिने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केलं… त्यानंतर बॉलिवूडमध्ये.. अभिनेत्रीने स्वतःसाठी निवडलेला मार्ग वडिलांना मान्य नव्हता…पण अभिनेत्रीने स्वतःवर असलेल्या विश्वासाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं..

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे ती, दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री वाणी कपूर आहे. वाणी फक्त अभिनेत्री नसून उत्तम डान्सर देखील आहे. अभिनेत्रीने मॉडलिंग क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर वाणी कधीही माहे वळून पाहिलं नाही..

वाणी कपूर हिने तिच्या करियरची सुरुवात मालिकेतून केली. ‘स्पेशल @ 10 – राजूबेन’ ही वाणी हिची पहिली मालिका. त्यानंतर अभिनेत्रीने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत ‘शुद्ध देसी रोमान्स’ स्क्रिन शेअर करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमा आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.

‘शुद्ध देसी रोमान्स’ सिनेमातील अभिनेत्रीच्या अभिनयाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. सिनेमासाठी वाणी हिला बेस्ट फीमेड डेब्यू फिल्म अवॉर्ड देखील मिळालं. वाणी हिने स्वतःच्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. एकेकाळी हॉटेलमध्ये काम करणारी वाणी आज सिनेमांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करते.. एवढंच नाही तर, अभिनेत्री एका सिनेमासाठी १ कोटी रुपयांचं मानधन घेते..

मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्रीची नेटवर्थ १८ कोटी रुपये आहे. वाणी सिनेमांसोबतच मॉडलिंग, फोटोशूट आणि जाहिरातींच्या माध्यमातून तगडी कमाई करते. वाणी दिल्ली येथील राहणारी आहे. त्याठिकाणी अभिनेत्रीचं भव्य घर देखील आहे.. एवढंच नाही तर, अभिनेत्रीचं मुंबईत देखील आलिशान घर आहे. शिवया अभिनेत्रीकडे महागड्या गाड्यांचं देखील कलेक्शन आहे. अभिनेत्रीकडे ऑडी यांसारख्या महागड्या गाड्या आहेत.

वाणी कपूर हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘शुद्ध देसी रोमान्स’ सिनेमानंतर अभिनेत्रीने ‘बेफिक्रे’, ‘वॉर’, ‘बेल बॉटम’, ‘चंडीगढ करे आशिकी’ आणि ‘शमशेरा’ सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्याचं मनोरंजन केलं आहे. आता अभिनेत्री लवकरच, ‘मंडला मर्डर्स’ या वेब सीरीजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे.