Bollywood Richest Family: झगमगत्या विश्वात असे अनेक कुटुंब आहेत जे गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहेत. शिवाय बॉलिवूडचं प्रतिष्ठित कुटुंब म्हणून देखील त्यांची ओळख आहे. बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय कुटुंब म्हणजे कपूर, खान आणि बच्चन… पण बॉलिवूडमध्ये असं देखील एक कुटुंब आहे जे या तीन कुटुंबापेक्षा देखील अधिक श्रीमंत आहे. कुटुंबाची नेटवर्थ तब्बल 10 हजार कोटी आहे. सध्या ज्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे ते कुटुंब दुसरं तिसरं कोणी नसून कुमार कुटुंब आहे.
कुमार कुटुंब हे टी-सीरीज कंपनीचे मालक आहेत. कुमार कुटुंबिय गेल्या अनेक वर्षांपासून एकापेक्षा एक सिनेमांची निर्मिती करत आहेत. त्यांची संपत्ती जाणून तुम्हाला देखील धक्का बसेल. GQ India च्या रिपोर्टनुसार, संगीत साम्राज्याचे नेतृत्व भूषण कुमार यांच्याकडे आहे, जे T-Series चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत, त्यांचे काका कृष्ण कुमार देखील व्यवसायात सक्रिय आहेत.
टी-सीरीजची कथा दिवंगत गुलशन कुमार यांनी 1983 मध्ये लिहिली होती. GQ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ‘कयामत से कयामत तक’ आणि ‘आशिकी’ च्या साउंडट्रॅक चार्टवर येईपर्यंत टी-सीरीजला त्याची लय सापडली नाही. पण कुमार कुटुंब बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक विक्रम रचत आहेत.
GQ इंडियाच्या रिपोर्टनुसार, कुमार कुटुंबाची नेटवर्थ 1.2 अरब डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार जवळपास 10 हजार कोटी आहे. कुमार कुटुंब हे बॉलिवूड मधील सर्वांत श्रीमंत कुटुंब आहे. बॉलिवूडचे लोकप्रिय सेलिब्रिटी देखील कुमार कुटुंबापुढे फेल आहेत.
भूषण कुमार सतत सिनेमांमध्ये गुंतवणूक करत कुटुंबाचा व्यवसाय वाढवत आहोत. सांगायचं झालं तर, कुमार कुटुंबानंतर चोप्रा कुटुंब बॉलिवूडमधील सर्वांत श्रीमंत कुटुंब आहे. चोप्रा कुटुंबाची नेटवर्थ 8 हजार कोटी आहे. तर, बच्चन कुटुंबियांची नेटवर्थ 4500 कोटी आहे.