मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. मलायका अरोरा हिने छैया छैया गाण्यावर धमाकेदार असा डान्स केला. मात्र, मलायका अरोरा हिने चित्रपटांमध्ये फार काम केले नाहीये. मात्र, असे असतानाही मलायका अरोरा ही अत्यंत लग्झरी असे आयुष्य जगताना दिसते. अनेकांना प्रश्न पडतो की, चित्रपटांमध्ये काम न करताही मलायका अरोरा लग्झरी आयुष्य कसे जगते आणि तिला पैसा कसा मिळतो.
मलायका अरोरा ही जरी चित्रपटांपासून दूर असली तरीही ती टीव्ही शोमध्ये जजचे काम करते. यामधून ती चांगली कमाई करते. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही एका टीव्ही शोच्या एपिसोडसाठी 5 ते 6 लाख रूपये फीस घेते. रिपोर्टनुसार मलायका अरोरा हिने अनेक व्यवसायांमध्ये आपले पैसे गुंतवले आहेत, ज्यातून तिला मोठा पैसा देखील मिळतो.
यासोबतच मलायका अरोरा हिने फिटनेस ॲप, योगा, ई-कॉमर्स ब्रँड आणि फॅशन व्यवसायामध्येही मोठी गुंतवणूक केलीये. मलायका अरोरा ही बांद्रामध्ये ज्या घरात राहते, त्या घराची किंमत ही 20 कोटींपेक्षा अधिक आहे. फक्त हेच नाहीतर मलायका अरोरा हिच्याकडे अत्यंत आलिशान आणि महागड्या गाड्या असल्याचे देखील सांगितले जाते. अनेक मोठ्या ब्रँडची ॲम्बेसेडर देखील मलायका आहे.
मलायका अरोरा हिचे मुंबईतील पाली येथे अत्यंत आलिशान घर आहे आणि ते घर तिने भाड्याने दिले आहे. दरमहिन्याला अभिनेत्रीला या घराचे भाडे 1.57 लाख मिळते. 100 कोटी मलायका अरोरा हिचे नेटवर्थ देखील आहे. मलायका अरोरा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मोठी कमाई करते. सोशल मीडियावर ती सक्रिय दिसते.
आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच मलायका अरोरा दिसते. आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देतानाही मलायका दिसते. मलायका अरोरा ही अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. विशेष म्हणजे लवकरच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर लग्न करणार असल्याचेही सांगितले जाते.