हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सतत सांगितले जात होते. मात्र, घटस्फोटाच्या चर्चांवर बोलणे हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी काही महिने टाळले. भारती संघाने T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतरही एक पोस्ट देखील नताशा स्टॅनकोविक हिने सोशल मीडियावर शेअर केली नाही. भारत सोडून सर्बियाला नताशा स्टॅनकोविक ही आपल्या मुलासोबत गेलीये. त्यानंतर नताशा आणि हार्दिक पांड्या यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपण घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले.
हार्दिक पांड्या याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना नताशा ही दिसत आहे. नताशा हिने इंस्टाग्राम स्टोरीवर मुलगा अगस्त्य याच्यासोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. मुलासोबत मस्ती करताना नताशा दिसत आहे.
पार्कमधील काही खास फोटो नताशा हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. घटस्फोटामधून बाहेर पडण्यासाठी मुलासोबत जास्त वेळ घालवताना नताशा दिसत आहे. हार्दिक पांड्या याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशा ही भारतात येणार की नाही? असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातोय. काही रिपोर्टनुसार सध्याच नताशा भारतामध्ये येणार नाहीये.
हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी लग्नाच्या चार वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा यांनी कोर्ट मॅरेज केले होते. गेल्याच वर्षी अत्यंत शाही पद्धतीने यांचा विवाहसोहळा परत एकदा राजस्थानमध्ये पार पडला. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते.
हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी घटस्फोटाच्या पोस्टमध्येच स्पष्ट केले होते की, मुलाचा सांभाळ दोघे मिळून करणार आहेत. हार्दिक पांड्या याच्या प्रत्येक सामन्यात त्याला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमध्ये नताशा ही पोहोचत. काही वर्षे एकमेकांना डेट करून हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.