मुंबई – अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेणा-या कपील शर्मा (kapil sharma) यांच्या कॉमेडी (comedy) शो मध्ये त्याने अनेक मान्यवरांना बोलावून त्यांना बोलतं केलं आहे. तिथे कलाकार, खेळाडू तसेच देशातील अन्य मान्यवर मंडळी नेहमी तिथं येत असतात. तसेच कपील शर्मा यांच्या कॉमेडीचे देशात फॅन (fan) आहेत.
पुढच्या येणा-या शो मध्ये तिथं दोन क्रिकेटपटू गेले होते. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या जोडगोळीची सोशल मीडियावर चर्चा असते. येत्या शो मध्ये ते स्पेशल पाहणे म्हणून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन आहेत. सचिन तेंडूलकर नंतर पृथ्वी शॉ याचा कसोटी क्रिकेटमध्ये सगळ्यात फास्ट शतक लगावल्याची नोंद आहे.
अंडर 19 च्या वर्ल्डकप मध्ये भारतीय संघाचा कर्णधार राहिलेल्या पृथ्वी शॉ याने आपल्या करिअरची सुरूवात अत्यंत चांगल्या पध्दतीने केली आहे. त्यांच्या वडिलांनी त्याला 3 वर्षाचा असताना एका क्रिकेट अकाडमीमध्ये दाखल केले होते. सुरूवातीच्या काळात पृथ्वीने प्लास्टिकच्या बॉलने खेळण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर त्याने टेनिस खेळले असे कपिलच्या शॉ दरम्यान सांगितल्याचे सुत्रांकडून कळतंय.
अनेकदा खेळाडूंचा सुरूवातीला जीनवप्रवास हा अत्यंत खडतर असतो, कारण अनेक संघर्ष केल्यानंतर त्यांना मॅचेस खेळण्याची संधी मिळते.
कपिलने पृथ्वीला विचारले की, एवढ्या लहान वयात तुला खेळ समजला का? यावर पृथ्वीने उत्तर दिले, “नाही, मला हा खेळ समजला नाही. माझे बाबा जे सांगायचे ते मी करायचो. जेव्हा मी 6 किंवा 7 वर्षांचा होतो. तेव्हा मला हा खेळ समजू लागला. माझ्या वडिलांना क्रिकेटची आवड होती. त्यावेळी आमच्या परिसरात एकच टेलिव्हिजन सेट होता, त्यामुळे माझे बाबा मला तिथे घेऊन जायचे. तो सचिन सरांचा (सचिन तेंडुलकर) खूप मोठा चाहता होता, जो त्यावेळी त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर होता. त्यामुळे सचिन जेव्हा-जेव्हा गोलंदाजी करायचा तेव्हा बाबा घरी यायचे. त्यांची क्रिकेटची आवड एवढी होती की मी फक्त क्रिकेट खेळावे अशी त्यांची इच्छा होती.