अभिनेता आमिर खान याची दुसरी पत्नी आणि दिग्दर्शिका किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ सिनेमाने एक उदाहरण प्रेक्षकांच्या समोर ठेवला आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तर तगडी कमाई केलीच, पण सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील हीट ठरला. आता सिनेमातून हटवण्यात आलेला एक सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सीन खुद्द नेटफ्लिक्सने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. सध्या सोशल मीडियावर ‘लापता लेडीज’ सिनेमातून हटवण्यात आलेल्या सीनची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील सीन प्रचंड आवडला आहे.
रवी किशन यांनी ‘लापता लेडीज’ सिनेमामध्ये इन्स्पेक्टर श्याम मनोहर यांची भूमिका साकारली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये रवी किशन बेपत्ता झालेल्या महिलांबद्दल दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याशी बोलत असल्याचे दिसून येत आहे.
व्हायरल होत असलेल्या सीनमध्ये रवी किशन, 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इत्तेफाक’ सिनेमाबद्दल बोलताना दिसत आहेत. सिनेमाबद्दल बोलताना रवी किशन म्हणतात त्यांनी ‘इत्तेफाक’ सिनेमा अनेकदा पाहिला आहे. म्हणून सतत एकच सिनेमा पाहिल्यामुळे त्यांना कंटाळा देखील येऊ लगाला होता.
पुढे बेपत्ता झालेल्या महिलांबाबत रवी किशन म्हणाले, ‘एक परकी स्त्री, एका परक्या पुरुषासोबत स्टेशनपासून बस त्यानंतर घर पर्यंत जाते. पण दोघांना देखील माहिती नसतं त्यांच्यासोबत कोण आहे. मुलीला तिच्या सासरचं नाव माहिती नाही. फोन नं. चुकीचा आहे. पोलीस स्थानकाचं नाव घेताच ती घाबरते… इत्तेफाकला देखील एक मर्यादा असते…’ असा सीन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
‘लापता लेडीज’ सिनेमाची कथा दीपक आणि फुल यांच्या भोवती फिरताना दिसत आहे. चाहत्यांना देखील सिनेमाची कथा प्रचंड आवडली. लापता लेडीज’ सिनेमाला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. अनेक सेलिब्रिटींनी देखील सिनेमाचं कौतुक केलं. सिनेमामुळे किरण राव हिच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत वाढ झाली आहे. किरण कायम खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.