Bachchan Family: बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आणि कुटुंब आहे जे एकमेकांचं तोंड देखील पाहत नाहीत. आज अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेऊ जो गेल्या 30 वर्षांपासून बच्चन कुटुंबासोबत बोलत नाही. दोघांमध्ये ३६ चा आकडा आहे. त्या अभिनेत्यासोबत महानायक अमिताभ बच्चन यांनी स्क्रिन देखील शेअर केली. पण सिनेमानंतर दोघे कधीच एकत्र दिसले नाही. एवढंच नाही तर, अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने देखील अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर केली. पण सिनेमा कधी प्रदर्शित झालाच नाही.
बच्चन कुटुंब आणि त्यांच्या शत्रूची चर्चा रंगल्यानंतर सर्वांचं लक्ष अभिनेता सलमान खानच्या दिशेने जातं. पण बच्चन कुटुंबाचा शत्रू सलमान खान नसून अभिनेता सनी देओल आहे. रिपोर्टनुसार, सनी देओल गेल्या 30 वर्षांपासून बच्चन कुटुंबियांसोबत बोलत नाही. 30 वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन आणि सनी देओल ‘इंसानियत’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आले. सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट देखील ठरला. पण ‘इंसानियत’ सिनेमानंतर सनी आणि बिग बी कधीच एकत्र दिसले नाहीत.
सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सनी देओल याच्या चाहत्यांची संख्या वाढली. ‘इंसानियत’ सिनेमातील सनीची भूमिका देखील चाहत्यांना प्रचंड आवडली. पण सनी देओल याची नवीन ओळख निर्माण होत असल्याचं लक्षात येताच अमिताभ बच्चन चिंतीत झाले.
रिपोर्टनुसार, सनी देओल आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाला. अमिताभ सनीला आपला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मानू लागले होते. रिपोर्ट्सनुसार, सिनेमा अमिताभ यांची भूमिका छोटी होती, मात्र नंतर त्यांच्या भूमिकेत वाढ करण्यात आली. सिनेमाच्या पोस्टरमध्ये सनीला दुर्लक्षित करताना अमिताभकडे जास्त लक्ष देण्यात आलं.
एवढं सगळं झाल्यानंतर सनी याने बिग बींसोबत कधीच काम न करण्याचा प्रण घेतला. दरम्यान, अशा काही गोष्टी घडल्या ज्यामुळे बच्चन कुटुंब आणि सनी देओल यांच्यातील वाद वाढू लागले. मीडिया रिपोर्टनुसार, ‘बॉर्डर’ सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक जेपी दत्ता यांनी सनी देओल याला आणखी एका सिनेमाचं वचन दिलं.
पण जेपी दत्ता यांनी ‘एलओसी: कारगिल’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं तेव्हा अमिताभ बच्चन यांना कास्ट केलं. याच कारणामुळे सनी देओल आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये देखील दुरावा निर्माण झाला. दोन्ही कुटुंब एकमेकांच्या कार्यक्रमांमध्ये देखील दिसत नाहीत.
एवढंच नाही तर, बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय हिने देखील सनी देओल याच्यासोबत स्क्रिन शेअर केली आहे. पण सिनेमा कधी प्रदर्शितच झाला नाही. 1997 मध्ये ऐश्वर्या राय आणि सनी देओल यांचा ‘इंडियन’ सिनेमा चाहत्यांच्या भेटीस येणार होता. पण सिनेमा कधी प्रदर्शित झालाच नाही. अशात दोघांच्या नात्यात देखील कटुता निर्माण झाली.
घडलेल्या प्रकरणानंतर ऐश्वर्याने देखील सनीसोबत काम करण्यास नकार दिला. यावर सनीला राग आला आणि त्याने ऐश्वर्याला फटकारलं आणि तेव्हापासून तिनेही तिच्यापासून अंतर ठेवलं.