मुंबई : 22 सप्टेंबर 2023 | काही दिवसांपूर्वी महादेव ऑनलाईन बेटींग ऍपशी सबंधित माहिती समोर आली होती. महादेव ऑनलाईन बेटींग ऍपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचा ईडीला संशय होता. याप्रकरणी आता मनी लाँन्ड्रींगचा गुन्हा दाखल करत ईडीने चौकशी सुरु केली आहे. आता याप्रकणी ईडीने तब्बल अडीज कोटींची रोख रक्कम जप्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महादेव बेटिंग ऍपप्रकरणी ईडीची काल मुंबई आणि दिल्लीत छापेमारी करण्यात आली आहे. या बेटिंग ऍपप्रकरणी अद्यापही ईडीची सखोल चौकशी सुरु आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
बेटिंग ऍपच्या संचालकांच्या लग्नामध्ये झालेली २०० कोटी रुपयांची उधळपट्टी देखील ईडीच्या समोर आली आहे. शिवाय लग्नसोहळ्यात अनेक दिग्गज सेलिब्रिटी देखील उपस्थीत असल्याची देखील माहिती समोर येत आहे. महादेव चंद्रकर असं बेटिंग ऍपच्या संचालकाचं नाव आहे. महादेव चंद्रकर याचं लग्न झालं आणि त्याच्या लग्नात तब्बल २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले.
महादेव चंद्रकर याच्या लग्नसोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी असल्यामुळे ईडीने मुंबई आणि दिल्ली याठिकाण छापेमारी केली. २०० कोटींशिवाय अन्य गोष्टी देखील जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे… महत्त्वाचं म्हणजे महादेव चंद्रकर याच्या लग्नात हजर राहिल्यामुळे अनेक सेलिब्रिटींच्या अडचणी वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याप्रकरणात जवळपास १४ सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत. ईडीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक सेलिब्रिटी परेशात इव्हेंटला गेले होते. कार्यक्रमासाठी त्यांना पेमेंट देखील करण्यात आलं होतं. ईडी याप्रकरणी अधिक चौकशी करत आहे. पण लग्नसोहळ्यात उपस्थित राहिलेल्या सेलिब्रिटींच्या अडचणीत मोठी वाढ होणर असल्याचं सांगण्यात येत आहे.
येत्या काळात संबंधित सेलिब्रिटींनी ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागू शकतं. लवकरचं सेलिब्रिटींना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात येईल अशी माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे या छापेमारीतून काय समोर येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली यांची नावे देखील समोर आल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. संबंधित सेलिब्रिटींच्या चाहत्यांना देखील मोठी धक्का बसला आहे. आता चौकशीनंतर काय समोर येईल याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.