मुंबई : टिकटॉक स्टार तान्या परदाजीचे (Tanya Pardazi) निधन झाल्याची धक्कादायक माहिती मिळतंय. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी तान्याने जगाचा निरोप घेतलायं. स्काय डायव्हिंग दरम्यान तिचा मृत्यू झालायं. रिपोर्ट्सनुसार, सोलो स्कायडायव्हिंग करत असताना पॅराशूट (Parachute) न उघडल्यामुळे उंचावरून पडून तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलायं. स्कायडायव्हिंग दरम्यान पॅराशूट न उघडल्यामुळे जमिनीवर पडून तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले जातंय. अपघातानंतर तान्याला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. मात्र, तिथे तिला मृत घोषित केले गेले.
तान्याची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग बघायला मिळते. जगातील अनेक देशामध्ये तान्याचे फाॅलोवर्स बघायला मिळतात. तिने मिस कॅनडा स्पर्धेतही उपांत्य फेरी गाठली होती. टिकटॉकवर तिचे सुमारे एक लाख फॉलोअर्स होते, जे कायमच तिच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असत. मात्र, तान्याचे असे अचानकपणे जाणे हे तिच्या चाहत्यांसाठी मोठा धक्काच आहे.
तान्या कॅनडातील टिकटॉकर आणि ब्युटी क्वीन होती. तिच्या Tik Tok प्रोफाईलचे सध्या 95.4K फॉलोअर्स आहेत. भारतामधूनही तान्याच्या फॉलोअर्सची संख्या अधिक होती. आपण जर तान्याचे काही व्हिडीओ बघितले तर आपल्या नक्कीच लक्षात येईल की, तान्याच्या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात भारतीय फॉलोअर्स लाईक्स करत होते. सुरूवातील तान्याच्या निधनाची बातमी अनेकांना अफवा असल्याचे देखील वाटले होते.